गांधींऐवजी आपली छबी झळकविणाऱ्या पंतप्रधानांनी माफी मागावी ' - सचिन अहिर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 January 2017

गांधींऐवजी आपली छबी झळकविणाऱ्या पंतप्रधानांनी माफी मागावी ' - सचिन अहिर

मुंबई / 14 Jan 2017 -
खादी ग्रामोद्योग विकास महामंडळाच्या दिनदर्शिका आणि रोजनिशीवर राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या छायाचित्राऐवजी आपली छबी झळकावण्याच्या पंतप्रधानांच्या कृतीचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी पंतप्रधानांनी या प्रकरणी माफी मागावी अशी मागणी केली आहे. तसेच केंद्र सरकारच्या या कृत्याचा निषेध म्हणून रविवार दि. १५ जानेवारी रोजी आपण पुर्ण दिवस मंत्रालयाशेजारील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर बसून आंदोलन करणार असल्याची घोषणाही अहिर यांनी केली.
खादी ग्रामोद्योग विकास महामंडळाच्या दिनदर्शिका आणि रोजनिशीवर राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या छायाचित्राऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदींची छबी झळकल्याने देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. देशासाठी आपले संपुर्ण जीवन समर्पित करणाऱ्या गांधीजींचा हा अपमान असल्याचे सांगत मा. अहिर म्हणाले की,पंतप्रधानांच्या या कृतीमुळे देशभरात संतापाची भावना अाहे. दिनदर्शिकेवरून गांधीजींचे छायाचित्र हटवण्याचे नेमके कारण स्पष्ट होणे गरजेचे आहे. खादी अाणि ग्रामोद्योगासाठी आता गांधीजींची छबी सरकारला योग्य वाटत नाही का, असा सवाल करत गांधीजींच्या छायाचित्रासह या दिनदर्शिका आणि रोजनिशीचे पुनर्मुद्रण करण्याची मागणी अहिर यांनी केली. 

तसेच गांधीजींच्या छायाचित्राचे पुनर्मुद्रण झाल्याशिवाय मुंवईतील एकही खादी ग्रामोद्योग महामंडळाचे दुकान उघडू देणार नसल्याचेही अहिर यांनी स्पष्ट केले. याच मुद्द्यावरून शुक्रवारी महिला तसेच युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंत्रालयाच्या शेजारी असलेल्या गांधीजींच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले होते. तर रविवार दि. १५ जानेवारी रोजी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आपण स्वत: गांधीजींच्या याच पुतळ्याखाली बसून आंदोलन करणार असल्याचेही अहिर म्हणाले.

Post Bottom Ad