११ ते १३ जानेवारी अंध टी - २० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 January 2017

११ ते १३ जानेवारी अंध टी - २० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

मुंबई : ११ ते १३ जानेवारीदरम्यान द ब्लाइंड वेल्फेर आॅर्गनायजेशन आणि रोटरी क्लब बॉम्बे क्वीन सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने अंध खेळांडूसाठी टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. विविध ८ राज्यांतील एकूण १२० अंध खेळाडू या स्पर्धेत सामील होणार आहेत. विल्सन जिमखाना, मुंबई आणि कर्नाटका जिमखाना येथील मैदानांवर हे सामने पार पडणार आहेत.

संस्थेचे अध्यक्ष अर्जुन मुद्दा यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, रोटरीतर्फे अंध खेळांडून प्रोत्साहित करण्यासाठी या स्पर्धेला सहाय्य केले जात आहे. गेल्या सात वर्षांपासून अंधांची ही संघटना स्पर्धेचे आयोजन करत आहे. यंदापासून रोटरीने सहाय्य करत अंध खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यासाठीच विजेत्या संघासह, उपविजेत्या आणि मालिकावीर असे पारितोषिके देण्यात येणार आहेत. द ब्लाइंड वेल्फेर आॅर्गनायजेशनचे अध्यक्ष अरूण भारस्कर म्हणाले की, या स्पर्धेत महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, प.बंगाल, जम्मू काश्मीर, हरयाणा, पंजाब, मध्य प्रदेश येथील संघ सामील होणार आहेत.

Post Bottom Ad