कर्जमाफीसंदर्भातील 'टोलवाटोलवी'ने शेतकऱ्यांमध्ये नैराश्य, संतापाचे वातावरण : धनंजय मुंडे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कर्जमाफीसंदर्भातील 'टोलवाटोलवी'ने शेतकऱ्यांमध्ये नैराश्य, संतापाचे वातावरण : धनंजय मुंडे

Share This
मुंबई - शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधकांची आग्रही भूमिका कायम असून विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारच्या दुटप्पीपणावर आज जोरदार कोरडे ओढले. राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफीचा उल्लेख नाही. मुख्यमंत्री म्हणतात, केंद्राच्या मदतीनं कर्जमाफी देऊन, परंतु केंद्रातले मंत्री मात्र तसं राष्ट्रीय धोरण नसल्याचे सांगून कर्जमाफी देणं शक्य नसल्याचं सांगतात. राज्य व केंद्र सरकारची ही टोलवाटोलवी म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक तसंच जनतेच्या डोळ्यात धुळफेक असल्याचा आरोप, मुंडे यांनी केला. सरकारच्या भूमिकेनं राज्यातल्या शेतकऱ्यांमध्ये नैराश्य व संतापाचे वातावरण आहे, असंही त्यांनी सांगितले.
आज सभागृहाचे कामकाज सुरु होताच मुंडे यांनी नियम 289 अन्वये शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला. मुंडे म्हणाले की, केंद्राच्या मदतीनं कर्जमाफी जाहीर करु, असं मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलं आहे. परंतु केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू हे मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं शक्य नसल्याचं सांगत आहेत. या टोलवाटोलवीने शेतकऱ्यांमध्ये नैराश्येचं, संतापाचं वातावरण आहे. दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणामुळे आज शेतकरी आत्महत्या करीत आहे. मुलांचा सांभाळ करणं शक्य नसल्यानं सरकारने मुलं विकत घ्यावी, अशी विनंती एका शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर असून यातून आत्महत्या वाढण्याची भीती आहे, त्यामुळे सरकारने शेतकरी कर्जमाफी जाहिर करावी, किंवा व्याजमाफी तरी तातडीने द्यावी, अशी मागणी मुंडे यांनी केली.

लोकशाहीच्या मंदिरात लोकशाही नाही तर ठोकशाही सुरु आहे, कर्जमाफीच्या मुद्द्यावर आमदार लढत असताना आमच्या आमदारांना निलंबित केले .शेतकरी_कर्जमाफी साठी निलंबनच काय कोणतीही कारवाई झाली तरी आपला लढा सुरूच ठेऊ अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी आमदार निलंबनावर माध्यमांशी बोलतांना दिली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages