मागाठाणे येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाची चौकशी - प्रकाश महेता - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 April 2017

मागाठाणे येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाची चौकशी - प्रकाश महेता

मुंबई.दि, 6 - बोरीवली (पूर्व) येथील मागाठाणे येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाची चौकशी गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्यामार्फत करण्यात येईल, असे गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी आज विधानपरिषदेत सांगितले. मुंबई उपनगरातील बोरीवली पूर्व देवीपाड्यात एसआरए प्रकल्पासंदर्भात विधानपरिषद सदस्य प्रविण दरेकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.त्याला उत्तर देताना महेता बोलत होते. 
महेता पुढे म्हणाले की, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये समाविष्ट 4 पुनर्वसन इमारतींचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असून, इमारत क्र.2ला 2008 मध्ये, इमारत क्र.1 व 3 ला 2009 मध्ये, तर इमारत क्र. 4 ला 2017 मध्ये भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले आहे. या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र देण्यापूर्वी मल:निस्सारण खाते, जल खाते, रस्ते विभाग, विद्युत विभाग (रिलायन्स), मालमत्ता कर विभाग व उदवाहनासाठी बांधकाम विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र घेण्यात आले आहे. तसेच या इमारतींना सर्व मुलभूत सुविधा देण्यात आल्या आहेत. तसेच मागाठाणे येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यासंदर्भात गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्यामार्फत चौकशी करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Post Bottom Ad