पालिकेचा ऐतिहासिक पराक्रम - जलबोगद्यात बसविली ८ हजार किलो वजनाची झडप - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 April 2017

पालिकेचा ऐतिहासिक पराक्रम - जलबोगद्यात बसविली ८ हजार किलो वजनाची झडप

जलबोगद्यात पहिल्यांदाच बसविली ८ हजार किलो वजनाची व १२.५० फूट व्यासाची झडप - 
मुंबई (प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेच्या 'पाणी पुरवठा प्रकल्प' विभागाद्वारे गुंदवली ते भांडूप संकुल या जलबोगद्यावर ८ हजार किलो वजनाची व ९ हजार ६८० आटे असणारी १२.५० फूट व्यासाची मोठी झडप बसवण्याचा ऐतिहासिक पराक्रम जलविभागाने केला आहे. कापूरबावडी येथे झडप बसविण्याचे काम अंतीम टप्प्यात आहे. या झडपेमुळे 'गुंदवली ते कापुरबावडी' कापुरबावडी ते भांडुप' अशा दोन भागांमध्ये विभागणे तांत्रिकदृष्ट्या आता शक्य होणार आहे, अशी माहिती उपायुक्त रमेश बांबळे यांनी दिली.

गुंदवली येथून भांडूप संकुल येथे पाणी वाहून नेण्यासाठी महापालिकेने डिसेंबर-२०१६ मध्ये नवा जलबोगदा कार्यान्वित करण्यात आला आहे. १८ फूट व्यासाचा (५.५० मीटर) व १५.२० किलोमीटर लांबीचा हा जलबोगदा पूर्णपणे पाणी विरहीत करणे आवश्यक होते. यामुळे गुंदवली येथून भांडूप संकुल येथे करावयाच्या दैनंदिन पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता होती. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेच्या 'पाणी पुरवठा प्रकल्प' विभागातर्फे या जलबोगद्यामध्ये कापूरबावडी येथे 'बटरफ्लाय व्हॉल्व' बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या झडपेमुळे भविष्यात देखभाल करण्याची स्थिती उद् भवल्यास त्या दरम्यान जलबोगद्याचा निम्मा भाग सुरु ठेवणे व आधीच्या जलवाहिनीचा वापर करुन पाण्याचे वहन करणे शक्य होणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर सध्या तात्पुरत्या स्वरुपात लागू करण्यात आलेली १० टक्के पाणी कपात दि. ९ एप्रिल २०१७ पासून मागे घेण्यात येणार आहे, असे बांबळे यांनी सांगितले.

१२ हजार किलो वजनाची क्रेन ---
८ हजार किलो वजनाची झडप बसविण्यासाठी १२ हजार किलो वजनाची क्रेन वापरण्यात येत आहे. या झडपेला ९ हजार ६८० आटे असून ही झडप उघडण्यासाठी ९ तास व बंद करण्यासाठीही ९ तास एवढा वेळ लागणार आहे. महापालिकेच्या जलबोगद्यामध्ये पाण्याचा दाब हा साधारणपणे प्रत्येक चौरस सेंटीमीटरला १६ किलो एवढा असतो. ही बाब लक्षात घेऊन प्रत्येक चौरस सेंटीमीटरला २४ किलो एवढी क्षमता असणारी झडप जलबोगद्यात बसविण्यात आली आहे. या बटरफ्लाय झडपेची एकूण किंमत ९ कोटी रुपये एवढी आहे.

Post Bottom Ad