मुंबई, दि. 24 : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने दिव्यांग व्यक्तिंसाठी धोरणाचा मसुदा तयार करण्यात आला आहे. या मसुद्यावर अंतिम स्वरुप देण्यासाठी दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांच्याकडून तसेच जनतेकडून सूचना, अभिप्राय मागविण्यात आले आहेत. संबंधितांनी आपल्या सूचना दि. 23 मे 2017 पर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
दिव्यांग व्यक्तिंच्या उन्नतीसाठी राज्य शासनाने दिव्यांग धोरणाचा मसुदा तयार केला आहे. हा मसुदा नागरिकांना पाहण्यासाठी तसेच सूचना व अभिप्राय यांच्यासाठी खुला करण्यात आला आहे. मराठी व इंग्रजी भाषेतील हा मसुदा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या www.sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या मसुद्यासंदर्भात राज्यातील दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था, तज्ज्ञ, थेरपिस्ट आदींकडून सूचना, अभिप्राय मागविण्यात आल्या आहेत. काही सूचना,अभिप्राय असल्यास दि. 23 मे 2017 पर्यंत acdisability2017@gmail.com या ई मेल पत्त्यावर अथवा अपंग कल्याण आयुक्तालय, 3 चर्चरोड, पुणे-01, या पत्त्यावर स्वहस्ते अथवा पत्राद्वारे पाठविण्यात याव्यात, असे आवाहन अपंग कल्याण आयुक्तांनी केले आहे.
No comments:
Post a Comment