बेकायदा इमारतीसाठी म्हाडाने शिर्के कंपनीला दिले 19 कोटी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 April 2017

बेकायदा इमारतीसाठी म्हाडाने शिर्के कंपनीला दिले 19 कोटी

मुंबई (प्रतिनिधी) - मुंबई पालिकेची परवानगी न घेता मेसर्स शिर्के कंपनीने बांधलेल्या इमारती बेकायदा ठरल्यानंतर म्हाडाने खर्चाची रक्कम म्हणून कंपनीला 19 कोटी इतकी रक्कम अदा केली आहे. याबाबतचा खुलासा माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना म्हाडाकडून प्राप्त झाला आहे. कलीना येथील म्हाडाच्या जमिनीवर ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांसाठी 'मैत्री' या नावाची इमारत बांधण्यात आली आहे. हे बांधकाम करताना म्हाडाने पालिकेची परवानगी घेतली नव्हती, असे गलगली यांनी सांगितले.

उच्च उत्पन्न वर्गाच्या 72 घरांसाठी 31 मार्च 2017 पर्यंत 20कोटी 14 लाख 78 रुपये झाले आहे. म्हाडाने 31 मार्च 2017 पर्यंत मेसर्स बी जी शिर्के कंपनीला 18 कोटी 83 लाख 80 रुपये अदा केले आहे. यामुळे म्हाडाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न निर्माण झाला आहे, अशी माहिती गलगली यांनी दिली. अनधिकृत बांधकामावर खर्च केलेली रक्कम देण्यापूर्वी पालिकेच्या परवानगीची शहानिशा करण्याची आवश्यकता होती. ज्याकडे म्हाडाने दुर्लक्ष केले आहे. पालिकेने सदर अनधिकृत बांधकाम तोडल्यास कोटयावधीची दिलेली रक्कम परत शिर्केकडून वसूल करणे शक्य होणार नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad