पालिका विरोधी पक्षनेते पदाचा गुंता लवकरच सुटणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिका विरोधी पक्षनेते पदाचा गुंता लवकरच सुटणार

Share This
मुंबई ( प्रतिनिधी ) – मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर गेल्या एक महिन्यापासून  निर्माण झालेला विरोधी पक्षनेते पदाचा गुंता आता लवकरच सुटणार आहे. पालिकेच्या विधी खात्याने आपले कायदेशीर मत नोंदवल्याने आता प्रक्रिया सुरू झाली आहे. कायद्यातील तरतूदीनुसार दोन नंबरचा पक्ष असलेल्या भाजपला विरोधी पक्षनेते पदासाठी पाचारण केले जाणार आहे. तसे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी भाजपला पत्र पाठवले आहे. भाजप हे पद स्वीकारण्यास इच्छुक नसेल तर त्यानंतरच्या संख्याबळ असलेल्या काँग्रेस पक्षाला हे पद देण्याबाबत विचार केला जाणार आहे. विधी खात्याने नोंदवलेल्य़ा मतानंतर विरोधीपक्ष नेते पदाचा पेच सुटणार आहे
मुंबई पालिकेत महापौर बसल्यानंतर जवळपास महिना उलटला तरी विरोधी पक्षनेते पदाचा पेच सुटलेला नाही. पालिकेत दुस-या क्रमांकांवर असलेल्या भाजपने पालिकेत कोणत्याही पदाची निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर केले आहे. त्यामुळे विरोधीपक्षनेते पदही नको असे भाजपने स्पष्ट केले आहे. कायद्यानुसार पालिकेत दोन नंबरच्या पक्षालाच विरोधीनेते पद देता येते असे असल्याने या पदाचा पेच कायम आहे. विरोधीपक्षनेते पद भाजप स्वीकारणार नसेल तर त्यानंतर संख्येनुसार असलेल्या काँग्रेसने या पदावर दावा केला आहे. काँग्रेसचे रवी राजा यांनी महासभेत हरकतीचा मुद्दा मांडून या पदावर दावा केला होता. त्यानुसार विधी खात्याच्या कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर निर्णय घेतला जाईल असे महापौरांनी स्पष्ट केले. विधी खात्याने यावर आपले कायदेशीर मत नोंदवले असून त्यानुसार या पदाबाबत प्रक्रिया सुरू झाली आहे. कायद्यातील तरतूदीनुसार महापौर महाडेश्वर यांनी भाजपला पत्र पाठवून हे या पदासाठी पाचारण केले आहे. भाजपने यापूर्वीच हे पद स्वीकारणार नाही असे तोंडी जाहिर केले होते. मात्र हेच भाजपला पत्राला उत्तर लेखी द्यावे लागेल. भाजप इच्छुक नसेल तर त्यानंतर संख्याबळ असलेल्या काँग्रेसला पाचारण केले जाईल. महासभेत या पदासाठी काँग्रेसने तसा दावा केला आहे. मात्र भाजप या पत्राला लेखी उत्तर देणार हा प्रश्न आहे. शिवाय दिलाच तर काय देणार त्यानंतर कायद्यातील तरतूदीनुसार विरोधीनेते पदाचा पेच सुटणार आहे. यावर महापौर काय निर्णय़ घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages