मुंबई / प्रतिनिधी - वाढत्या गर्मीमुळे महाराष्ट्रात स्वाईन फ्लूने थैमान घातले असताना त्याचा परिणाम मुंबईतही पाहायला मिळत आहे. मुंबईत इतर साथींच्या आजारांचे रुग्ण कमी झाले असताना मे महिन्याच्या १८ दिवसात महापालिका रुग्णालयात स्वाईन फ्लूचे तब्बल १८ रुग्ण दाखल झाले आहेत. तर लेप्टोच्या रुग्णांची संख्याही वाढल्याचे पालिकेच्या आकडेवारीवरून उघड झाले आहे.
मुंबईत पावसाळयात साथीच्या आजारांचे प्रमाण वाढलेले असते. मात्र मुंबईत वाढत्या उकाड्यात स्वाईन फ्लू आजार पसरत असल्याचे महापालिकेच्या जाहीर केलेल्या आकडेवारीवरून उघड झाले आहे. मुंबईत स्वाईन फ्लूचा मागील वर्षी मे महिन्यात एकच रुग्ण आढळला होता. यावर्षी मे महिन्याच्या १८ तारखेपर्यंत स्वाईन फ्लूच्या तब्बल १७ रुग्णांची नोंद पालिका रुग्णालयात झाली आहे. जानेवारी २०१७ ते १८ मे २०१७ या कालावधीत स्वाईन फ्लूचे एकूण ३७ रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी ३ जणांचा मृत्यू मझाल्याचे अहवालात म्हटले आहे.
मुंबईमध्ये मागील वर्षी (२०१६) मे महिन्यात डेंग्यूचे २७ रुग्णांची नोंद झाली होती यावर्षी मे महिन्याच्या १८ दिवसात १८ रुग्णांची नोंद झाली आहे. मलेरियाचे मागील वर्षी ४२३ रुग्णांची नोंद झाली होती यावर्षी १८८ रुग्णांची नोंद झाली आहे. लेप्टोचे मागील वर्षी २ रुग्णांची नोंद झाली होती यावर्षी ७ रुग्नाची नोंद झाली आहे. मागील वर्षी गॅस्ट्रोच्या ९२० रुग्णांची नोंद झाली होती यावर्षी अद्याप ४६९ रुग्णांची नोंद झाली आहे. हेपेटायसिसच्या रुग्णांची मागील वर्षी १३५ रुग्णांची नोंद झाली होत्या यावर्षी आता पर्यंत ४४ रुग्णांची नोंद झाली आहे.
मुंंबईत स्वाईन फ्लूचे ३७ रुग्ण -
२०१५ मध्ये स्वाईन फ्लूचे ३०२९ रुग्ण आढळून आले होते. यापैकी ३० हून अधिक जणांना जीव गमवावा लागला होता. २०१६ मध्ये स्वाईन फ्लूचे केवळ तीनच रुग्ण सापडले होते. २०१७ या वर्षी जानेवारीच्या सुरूवातीपासून स्वाईन फ्लूनेे डोके वर काढण्यास सुरूवात केली आहे. २०१७ मध्ये मुंंबईत आतापर्यंत ३७ स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ३ जणांचा मृत्यू झाला आहे. १ जानेवारी ते ३० एप्रिल २०१७ पर्यंत राज्यभरात ५०० हून अधिक स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले होते. यात १९६ हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला असून, ही संख्या पुणे व नागपूरमध्ये सर्वाधिक आहे.
आजार मे २०१६ १८ मे २०१७
डेंग्यू २७ १८
मलेरिया ४२३ १८८
लेप्टोस्पायरेसिस २ ७
स्वाईन फ्लू १ १७
ग्यास्ट्रो ९२० ४६९
हेपेटायसिस १३५ ४४