मेट्रो - शिवसेनेची चुप्पी, काँग्रेसचा विरोध, आरेला भेट देण्याची भाजपाची मागणी मान्य - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 May 2017

मेट्रो - शिवसेनेची चुप्पी, काँग्रेसचा विरोध, आरेला भेट देण्याची भाजपाची मागणी मान्य


मुंबई / प्रतिनिधी - राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई मेट्रो ३ प्रकल्पासाठी आरेच्या हरित पट्ट्यातील ३३ हेक्टर जागा आरक्षित केली जाणार आहे. याबाबत महापालिकेच्या सुधार समितीत आलेल्या प्रस्तावावर शिवसेनेच्या एकाही सदस्याने विरोध न करता चुप्पी साधली. या प्रस्तावाला काँग्रेसने जोरदार विरोध केला तर भाजपाच्या उज्वला मोडक यांनी आरेला भेट देण्याचे कारण देत सदर प्रस्ताव पुढे ढकलण्यात भाजपाला यश आले आहे.


नरिमन पॉइंट ते अंधेरी सिप्झपर्यंत धावणाऱ्या मेट्रो-३च्या कारशेडसाठी आरे वसाहतीची जागा निश्चित करण्यात आली आहे. मुंबईच्या प्रस्तावित विकास आराखड्यात कारशेडसाठी जागेचे आरक्षण ठेवण्यात आले आहे. आरेच्या एकूण जागेपैकी ३३ हेक्टर जागा मेट्रो कारशेड, वर्कशॉप, वाणिज्य सी १ वापरासाठी आरक्षित करा असा प्रस्ताव नगर विकास विभागाने महापलिकडे पाठवला आहे. नगर विकास विभागाने केलेल्या सुचने प्रमाणे महानगर पालिकेने आरे मधील आरक्षणात बदल करण्याचा प्रस्ताव सुधार समितीच्या बैठकीसमोर सादर करण्यात आला. या प्रस्तावावर शिवसेना आणि कॉंग्रेस विरोध करणार असणार असल्याने भाजपाच्या उज्वला मोडक यांनी आरेला भेट द्यायची कारण देत सदर प्रस्ताव पुढे ढकलण्याची मागणी केली.

तर कॉंग्रेसचे अशरफ आझमी यांनी मुंबईमध्ये मोकळे भूखंड 6 ते 8 टक्के असायला हवे होते परंतू आता फ़क्त दिड ते दोन टक्केच जागा मोकळी राहिली आहे. सर्वत्र सीमेंटचे जंगल उभे राहिले आहे. वातावरणाबरोबर छेड छाड़ केली जात असल्याने मुंबईचे तापमान 40 डिग्री पर्यंत गेले आहे. आरेच्या हरित पट्ट्यामधील जागेवरील झाडे तोड्ल्यास तापमानात आणखी वाढ होणार आहे. यामुळे आपण आपल्या पुढील पिढीला काय देणार आहोत याचा विचार करावा. मेट्रो साठी प्लानिंग कमिटीने सात जागा सुचवलेल्या असताना फ़क्त आरेसाठी आग्रह का धरला जात आहे. या सात जागा कोणत्या ? कांजुरच्या जागेचा प्रस्ताव होता मग त्यावर विचार का झाला नाही ? याची माहिती समितीला द्यावी अशी मागणी
अशरफ आझमी यांनी केली. दरम्यान भाजपाने व्हिजिटची मागणी अनंत नर यांनी मंजूर केली.

व्हिजिटने फरक पडत नाही ……
आरेची जागा मेट्रोला देण्यास शिवसेनेचा विरोध होता आजही आहे आणि या पुढेही राहणार आहे. समितीच्या बैठकीत एखाद्या सदस्याने व्हिजिटची मागणी केली तर व्हिजिट द्यावी लागते. त्याप्रमाणे भाजपाची व्हिजिटची मागणी माण्य करण्यात आली. आज पर्यंत अश्या व्हिजिट करून कोणतेही निर्णय बदलले नाहित. आरेची जागा मेट्रोला देण्यासाठी विरोध यापुढेही कायम असेल...
> अनंत नर, अध्यक्ष - सुधार समिती 

Post Bottom Ad