महास्वयंम पोर्टलचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महास्वयंम पोर्टलचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Share This

मुंबई, दि. 30 : कौशल्य विकास विभागाच्या महारोजगार, एमएसएसडीएस व महास्वयंरोजगार या तिन्ही वेबपोर्टलचे एकत्रिकरण करुन महास्वयंम हे वेब पोर्टल विकसीत करण्यात आले आहे. या वेबपोर्टलचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, कौशल्य विकास विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर, आयुक्त ई. रविंद्रन उपस्थित होते.


कौशल्य विकास (एमएसएसडीएस), रोजगार (महारोजगार) व उद्योजकता (महास्वयंरोजगार) याबाबत तीन स्वतंत्र वेब पोर्टल होती. सदर तिन्ही वेब पोर्टल एकाच ठिकाणी एकत्रित करुन महास्वयंम हे वेब पोर्टल विकसीत करण्यात आले. महास्वयंम पोर्टल वन स्टॉप शॉप म्हणून काम करणार आहे. हे सर्व प्लॅटफार्म एकाच ठिकाणी आपल्याला वापरता येणार आहेत. म्हणजे कौशल्य प्रशिक्षित लोकांची यादी ठेवता येईल, ज्यांना प्रशिक्षण घ्यावयाचे आहे, त्यांना नोंदी करता येतील, बेरोजगारांना नोंदी करता येतील आणि इंडस्ट्रिजला मागणीप्रमाणे नोंदणी करता येणार आहे. उमेदवारास एकाच ठिकाणी कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता विषयक माहिती एकत्रित उपलब्ध होणार आहे. प्रशिक्षण संस्थाना उमेदवारास प्रशिक्षण व प्रशिक्षणाचे देयक त्याचप्रमाणे रोजगार बाबत संपुर्ण माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. उद्योजकास सीएनव्ही ॲक्ट अन्वये रिक्त असलेली पदे अधिसुचित करणे, प्रसिध्दी देणे,योग्य उमेदवाराची निवड तयार करणे, मुलाखतीचा एसएमएस पाठविणे, अनिवार्य विवरण पत्र सादर करणे इ.सुविधा उपलब्ध आहेत. उमेदवारांना नोकरी बाबतची माहिती एकाच क्लिक बटनवर उपलब्ध आहे व याबाबत एस.एम.एस. उपलब्ध होण्याची सुविधा आहे. उमेदवार, उद्योजक यांना रोजगार मेळाव्यात सहभागी होणे सुलभ होणार आहे तसेच उमेदवार,उद्योजक यांना प्रशिक्षण नोंदणी सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.

उमेदवारास नोंदणी, रोजगार उपलब्धतेबद्दल माहिती व अर्ज भरणे, प्रशिक्षणा बाबतची माहिती, स्वयंरोजगाराबाबतची माहिती अर्ज भरणे, रोजगार मेळावे माहिती व सहभागी होण्याची सुविधा, रिक्त पदासाठी अर्ज करणे आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. प्रशिक्षण संस्थांसाठी नोंदणी, शासनाच्या कौशल्य विकास योजनेत सहभागी होणे, प्रशिक्षण शुल्क देयक, प्रशिक्षण शुल्क ईसीएस पध्दतीने प्राप्त होते. तसेच उद्योजकांसाठी नोंदणी, रिक्त पदे प्रसिध्द करणे, सुयोग्य उमेदवारांची यादी काढणे आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. एका बटनावर एकूण नोंदणीकृत उमेदवार / उद्योजक / प्रशिक्षण संस्था, एकूण कौशल्य विकास झालेले उमेदवार, एकूण नोकरी प्राप्त व स्वयंरोजगार करीत असलेले उमेदवार आदींची माहिती शासनास उपलब्ध होणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages