पूर्णा दि 7- महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती मिरवाणुकीवर दगडफेकिचा पूर्णा येथे झालेला प्रकार निंदनीय असून या प्रकारणाची सी आय डी मार्फ़त सखोल चौकशी होण्याची गरज असून त्यासाठी आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पूर्णा दगड़फेक प्रकरणी सी आय डी चौकशी ची मागणी करणार असल्याचे आश्वासन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले .
आज त्यांनी पूर्णा येथे भेट देऊन येथील जनतेशी संवाद साधला येथील लुंबिनी बुद्धविहारात भेट देऊन अंबेडकरी जनतेशी रामदास आठवले यांनी संवाद साधत 14 एप्रिल रोजी भीम जयंती दिनी घडलेला प्रकार जानून घेतला . या प्रकरणात येथील पोलिसांनी आमच्यावर अन्याय केला आहे निरपराध दलित तरुणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे . मिरवणुकीवर दगडफेक करणाऱ्या आरोपींना अद्याप अटक केली नसल्याची तकरार येथील अंबेडकरी जनतेने केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या कडे केली . यावेळी येथील अंबेडकरी जनतेच्या सर्व तकरारी कैफियत ना . आठवलेंनी ऐकून घेतल्या . दोन्ही समाजाला शांतातेचे आवाहन करून या प्रकरणी सी आय डी चौकशी ची येथील अंबेडकरी जनतेची मागणी मुख्यमंत्र्यांकड़ून मंजूर करणार असल्याचे आश्वासन ना रामदास आठवले यांनी दिले . यावेळी भदंत उपगुप्त महाथेरो भाजप नेते माजी आमदार विजय गव्हाणे तसेच जिल्हा अधिकारी पि. शिवशंकर जिल्हा पोलिस अधीक्षक झळके तसेच रिपाइं चे गौतम भालेराव बाबूराव कदम ;पप्पू कागदे; ब्रह्मानंद चव्हाण ; चंद्रकांत चिकटे धम्मानंद मुंढे तसेच पूर्णा येथील स्थानिक प्रकाश कांबळे अशोक ढोबले यादवराव सुनील कांबळे दिलीप आठवले आदि अनेक मान्यवर उपस्थित होते .
मराठा समाजाच्या आरक्षणाला आम्ही पाठिम्बा दिला आहे महाराष्ट्रातील गावागावात वर्षोनुवर्ष दलित आणि मराठा एकत्र राहताहेत . छेत्रपति शिवाजी महाराजांची जयंती आणि महामानव डॉ बाबासाहेब अंबेडकरांची जयंती दलित समाज संयुक्तरित्या साजरी करतो .महामानव डॉ बाबासाहेब अंबेडकरांची जयंती मराठा समाजानेही दलितांसोबत एकत्र येऊन साजरी केली पाहिजे पूर्णा येथे भीम जयंती मिरवणुकीवर दगड फेक करून झालेला हल्ला निंदनीय आणि महाराष्ट्राच्या पुरोगामी परिवर्तनवादी प्रतिमेवर कलंक लावनारी घटना आहे याचा आपण तीव्र धिक्कार केला असून दगड़फेक प्रकारणाची सी आय डी द्वारे सखोल चौकशी करणार असल्याचे ना रामदास आठवले म्हणाले .यावेळी बालकृष्ण इंगळे अजय मस्के लक्ष्मण बनसोड विजय मगरे सतीश गायकवाड़ आदि अनेक मान्यवर उपस्थित होते .