मुंबई / १४ जून २०१७ - मुंबईतील आदिवासी, झोपडीधारकांपासून ते व्यावसायिक पाणी वापर करणाऱ्या सर्वच ग्राहकांच्या पाण्याच्या दरात वाढ करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. पाण्याची दरवाढ करण्याबाबतचे निवेदन प्रशासनाने स्थायी समितीत आणले मात्र निवेदन वाचताच सर्वपक्षीय नगरसेवक व गटनेत्यांनी या पाणीवाढीस विरोध केला. प्रशासनाने पाणीदरवाढीचा रीतसर प्रस्ताव सादर केला तर त्यालाही विरोध करू असा इशारा भाजपसह विरोधी पक्षांनी प्रशासनाला दिला आहे.
पालिका प्रशासनाने पाणीपुरवठ्यासाठी होणार आस्थापना खर्च, प्रशासकीय खर्च, विद्युत शक्ती खर्च, शासकीय धरणातून उपसा केलेल्या पाण्याची पाणीपट्टी, इतर प्रचालन व परिरक्षण आदींमुळे होणाऱ्या खर्चाचे कारण देत ९ मे २०१२ रोजी स्थायी समितीकडून ५ वर्षासाठी घरगुती, बिगर घरगुती ग्राहाकाना करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा व मलनिसारंण सेवेच्या विद्यमान दरात ८ टक्के दरवाढ करण्यास मंजुरी घेतली होती. त्याप्रमाणे आतापर्यंत मुंबईकरांनी हि ८ टक्के दरवाढ केली जात होती. आता पालिकेने पुन्हा १६ जून २०१७ पासून ५. ३९ टक्के पाणी दरवाढ करण्याबाबतचे निवेदन आज स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यानी सादर केले .
या निवेदनानुसार झोपडीधारकांना एक हजार लिटर पाण्यामागे किमान १९ पैसे, इमारतींना २१ पैसे, व्यावसायिक संस्थांना १. ८९ रुपये, उद्योगधंदे कारखान्यांना २. ५१ पैसे, रेसकोर्स पंचतारांकित हॉटेलांना ३. ७७ पैसे, शीतपेय, बाटलीबंद पाण्यासाठी ५. रुपये व नियम १. ६ खाली समाविष्ठ ग्राहकांना ७. ४४ रुपये इतकी पाण्याची दरवाढ करण्याचे सुचवले आहे. मानवतावादी दृष्टिकोनातून पालिका ज्यांना जलजोडण्या देऊन पाणीपुरवठा केला जातो त्यांच्या पाणीदरातही २. ५६ रुपये एव्हढी वाढ करण्यात आली आहे. महापालिका १ एप्रिल २०१५ पासून लागू जल आकार नियमानुसार मलनिस्सारण आकार हा जल आकाराच्या ७० टक्के घेण्यात येतो.
पाण्याच्या बिलातही 5.39 टक्के वाढ -
निवेदनामध्ये जलअभियंता विभागातील आस्थापना खर्च, प्रशासकीय खर्च, विद्युत शक्ती खर्च, शासकीय धरणातून उपसा केलेल्या पाण्याची पाणीपट्टी तसेच इतर देखभाल खर्च आदींसाठी सन 2015-16 मध्ये 765.32 कोटी एवढा खर्च झाला होता. तर सन 2016-17 मध्ये 806.56 कोटी रुपये एवढा खर्च झालेला आहे. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत 5.39 टक्के एवढा खर्च वाढलेला असून, पाण्याच्या बिलातही 5.39 टक्के एवढी वाढ करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. या पाणी दरवाढीतून पालिकेला वर्षभरात 68.88 कोटी रुपये उत्पन्नवाढीची अपेक्षा आहे.
प्रवर्ग विद्यमान दर (रु) नवे दर (रु.)
घरगुती ग्राहक 3.49 3.68
प्रकल्प बाधितांची घरे 3.87 4.08
इतर घरगुती ग्राहक 4.66 4.91
बिगर व्यावासायिक संस्था 18.66 19.67
व्यावसायिक संस्था 34.99 36.88
उद्योग धंदे, कारखाने 46.65 49.16
रेसकोर्स,तारांकित हॉटेल्स 69.98 73.75
शितपेये आणि मिनरल कंपनी 97.20 102.44
प्रकल्प बाधितांची घरे 3.87 4.08
इतर घरगुती ग्राहक 4.66 4.91
बिगर व्यावासायिक संस्था 18.66 19.67
व्यावसायिक संस्था 34.99 36.88
उद्योग धंदे, कारखाने 46.65 49.16
रेसकोर्स,तारांकित हॉटेल्स 69.98 73.75
शितपेये आणि मिनरल कंपनी 97.20 102.44