पालिकेच्या अभियांत्रिकी विभागाचे संचालक लक्ष्मण व्हटकर यांना कारणे दाखवा नोटिस - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 June 2017

पालिकेच्या अभियांत्रिकी विभागाचे संचालक लक्ष्मण व्हटकर यांना कारणे दाखवा नोटिस


मुंबई - पावसाळयात मुंबईत पाणी साचणार नाही असा दावा पालिकेने केला आहे. पालिकेने पाणी साचणार नसल्याचा दावा केला असतानाच मुंबईत सुरु असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी गझदरबंध पंपिंग स्टेशन मुदतीत पूर्ण होऊ शकले नाही. तसेच ब्रिटानिया पंपिंग स्टेशनही वेळेत सुरू करण्यात आले नसल्याने यावर्षी पावसांत हिंदमाता येथे पाणी साचले. हे दोन्ही प्रकार लक्षात घेऊन पालिकेचे अभियांत्रिकी (प्रकल्प) विभागाचे संचालक लक्ष्मण व्हटकर यांना कारणे दाखवा नोटिस पाठवली आले आहे. व्हटकर यांनी या नोटिशीला समाधानकारक उत्तर दिले नाही तर त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

पावसाच्या साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिकेने आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च करून हाजी अली, इर्ला, लव्हग्रोव्ह, क्लिव्हलँड बंदर व ब्रिटानिया अशी पाच पंपिंग स्टेशन उभारून कार्यान्वित केली. सहावे गझदरबंध पंपिंग स्टेशनचे काम पूर्ण करण्याची मुदत मार्च महिन्यात संपली आहे. मुदतीत काम न झाल्याने कंत्राटदाराला पालिकेने दंड ठोठावला. तसेच अभियांत्रिकी संचालक लक्ष्णम व्हटकर यांना याबाबत वैयक्तिक जबाबदारी निश्चित करण्याबाबत आयुक्तांनी सूचना केल्या होत्य़ा. गझदर बंध पंपिंग स्टेशन 31 मे पर्यंत कार्यान्वित केले जाईल असे व्हटकर यांनी जाहिर केले होते. त्यानंतर 9 जूनची डेडलाईन दिली. मात्र यावेळीही गझदरबंध पंपिंग स्टेशनचे काम पूर्ण होऊन ते कार्यान्वित झालेले नाही. शिवाय हिंदमाता येथील ब्रिटानिया पंपिंग स्टेशनही वेळेत सुरू करता न आल्याने दोन दिवसांपूर्वी पडलेल्या पावसांत येथे पाणी साचले. या कारणावरून पालिकेचे अभियांत्रिकी संचालक लक्ष्मण व्हटकर यांना अतिरिक्त आयुक्त (पूर्व) यांनी कारणे दाखवा नोटिस पाठवले आहे. या नोटिशीला व्हटकर यांना उत्तर द्यावे लागणार आहे.

कार्यान्वित पम्पिंग स्टेशन्स -
हाजी अली पम्पिंग स्टेशन : 100 कोटी (काम पूर्ण)
इर्ला पम्पिंग स्टेशन : 90 कोटी रुपये (काम पूर्ण)
लव्हग्रोव्ह पम्पिंग स्टेशन : 102 कोटी रुपये (काम पूर्ण)
क्लिव्हलँड बंदर पम्पिंग स्टेशन : 116 कोटी रुपये (काम पूर्ण)
ब्रिटानिया पम्पिंग स्टेशन : 120 कोटी रुपये (काम पूर्ण)
गझदर पंपिंग स्टेशन - आतापर्यंत 132 कोटी खर्च (काम अद्याप अपूर्ण)

Post Bottom Ad