उघड्यावर शौच करणाऱ्या ६३० व्यक्तींवर दंडात्मक कारवाई - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 June 2017

उघड्यावर शौच करणाऱ्या ६३० व्यक्तींवर दंडात्मक कारवाई

मुंबई / प्रतिनिधी - 
मुंबईला हागणदारीमुक्त करण्यासाठी पालिकेने विविध उपाययोजना केल्या तरीही उघड्यावर शौच करणाऱ्यांचे प्रमाण काही कमी झालेले नाही. शौचालय उपलब्ध असूनही उघड्यावर शौच करणाऱ्यांचे प्रमाण कमी होत नसल्याने पालिकेने दंडात्मक कारवाईला सुरुवात केली. १८ जून ते ३० जून २०१७ या कालावधीत ६३० व्यक्तींवर प्रत्येकी १०० रुपये या प्रमाणे दंडात्मक कारवाई केली आहे आहे. सर्वाधिक दंड वसूली 'इ' विभागातून व त्यानंतर एफ दक्षिण, के पूर्व, एच पूर्व, के पश्चिम विभागातून दंड वसुली करण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली.

पालिकेद्वारे उघड्यावरील हागणदारी असणा-या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक शौचालये उपलब्ध करुन दिली आहेत. यानंतरही काही व्यक्ती उघड्यावर शौचास जात असल्याचे आढळून येत आहे. शौचालयाचा वापर करावा यासाठी सर्वस्तरीय जनजागृती अभियान राबविण्यात येते. मात्र, तरीही हे प्रमाण कमी होत नसल्याने उघड्यावर शौचास जाणा-या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने १७ जून २०१७ रोजी घेतला. त्यानुसार १८ जून ते ३० जून २०१७ पर्यंत ६३० व्यक्तींकडून सुमारे रुपये ६३ हजार एवढा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती व्यवस्थापन व्यवस्थापन सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली. नागरिकांना त्यांच्या निवासी परिसराच्या ५०० मीटरच्या परिघात शौचालय उपलब्ध करुन देणे, शौचालय वापरासाठी जनप्रबोधन करणे, त्यानंतरही शौचालयाचा वापर न करता उघड्यावर शौचविधी केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. यामुळे उघड्यावर शौच करणे टाळावे व शौचालयांचा वापर करावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.

Post Bottom Ad