मुंबई / प्रतिनिधी – कर्जमाफी व इतर मागण्यांसाठी राज्यातील सर्व सामान्य शेतकरी रर-त्यावर उतरला आहे या आंदोलनाचा निर्णय होई पर्यंत मल्हार क्रांती दलाचे सैनिक त्यात सहभागी राहणार आहेत. त्यामुळे चार जूनला धनगर आरक्षणासाठी नवी मुंबईला येथील कोंकण भवनवर काढण्यात येणाऱ्या मोर्चास तात्पुरती र-थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती मल्हार क्रांती मोर्चाचे समन्वयकी मारुती जानकर, डॉ. प्रमोद गावडे, बाळासाहेब किसवे आणि आशाताई लेंगरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
विरोधी पक्षात असताना आमचे सरकार सत्तेवर आल्यास पंधरा दिवसांत एस टी (S. T.) आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. आता भाजपाचे सरकार सत्तेवर येऊन तीन वर्षे व्ह्यायला आली असली तरी या आश्वासनाची अद्याप अंमलबजावणी केलेली नाही त्यामुळे मल्हार कांतीच्या वतीने 4 जून रोजी नवी मुंबई येथील कोंकण भवन येथील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र कर्जमाफी व इतर मागण्यांसाठी राज्यातील सर्व सामान्य शेतकरी रर-त्यावर उतरला आहे त्याची तीव्रता वाढत आहे धनगर समाजही शेतकरी आहे. तोही या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे. सर्वच समाजाच्या जिव्हाळयाचा असलेला प्रश्न सुटण्यासाठी मल्हार क्रांती मोर्चा शेतकरी आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देत आहे. या आंदोलनाचा निर्णय होई पर्यंत मल्हार क्रांती सैनिक त्यात सहभागी होणार आहेत. शेतकऱ्यांचा प्रश्न महत्वाचा असल्याने चार जूनला धनगर आरक्षणासाठी काढण्यात येणारा मोर्चा तात्पुरता स्थगित करण्यात येत असल्याचा निर्णय घेतला आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या मांगण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी मल्हार क्रांती मोर्चाचे समन्वयक डॉ प्रमोद गावडे, बाळासाहेब किसवे आणि आशाताई लेंगरे यांनी केली.