५ जूनला सर्व तहसीलदार कार्यालयात घुसून ताबा घेऊ - सीताराम येचुरी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 June 2017

५ जूनला सर्व तहसीलदार कार्यालयात घुसून ताबा घेऊ - सीताराम येचुरी


मुंबई / प्रतिनिधी - केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार सत्तेवर येण्यापूर्वी दिलेली आश्वासने धापा विसरली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन त्यापैकीच एक आहे. भाजपचे सरकार सत्तेवर येऊन तीन वर्षे पूर्ण झाली आहेत तरीही अद्याप कर्जमाफी देण्यास भाजपा सरकार अपयशी ठरले आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील शेतकरी संपावर गेले आहेत. या संपामध्ये मार्क्सवाडी कम्युनिस्ट पक्षाची अखिल भारतीय किसान सभा सहभागी आहे. येत्या दोन दिवसात सरकारने शेतकऱ्यांच्या कर्ज माफीचा निर्णय न घेतल्यास सोमवारी ५ जून रोजी महाराष्ट्रातील सर्व तहसीलदार कार्यालयात घुसून हि कार्यालय ताब्यात घेऊन कार्यालये बंद करु असा इशारा माकपचे पॉलिट ब्यूरिओ सदस्य व खासदार सीताराम येचुरी यांनी दिला.

मुंबईत शुक्रवारी माकपच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीला येचुरी आले होते. या नंतर मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मार्च २०१६ मध्ये याच मागणीसाठी नाशिक येथील मध्यवर्ती ठिकाणं असलेला सिफीएसचा भाग मार्च २०१६ मध्ये दोन दिवस ठिय्या आंदोलन करून बंद केला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेण्यासाठी ६ महिन्याचा कालावधी मागितला होता. एक वर्ष झाले तरी अद्याप मुख्यमंत्र्यांनी कोणतीही पाऊले उचललेली नाहीत असा आरोप येचुरी यांनी यावेळी केला. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार येऊन ३ वर्षे पूर्ण झाली तरी भाजपा सरकारला लोकांना दिलेली आश्वासने पूर्ण करता आलेली नाहीत असे येचुरी म्हणाले.

महाराष्ट्रात दरवर्षी १२ हजार शेतकरी आत्महत्या करतात. भाजपा सरकारच्या ३ वर्षाच्या कार्यकाळात ३६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या सर्व आत्महत्या कर्जामुळे झाल्या आहेत. भाजपाने शेतीमध्ये दिडपट उत्पन्न देण्याचे आश्वसन दिले होते. हे आश्वासनही भाजपाने पूर्ण केलेले नाही. आज विदेशातून स्वस्त असलेला गहू विदेशातून आणला जात असल्याने देशातील गहूला भाव कसा मिळेल ? शेतकरी अन्नदाता आहे. हा अन्नदाताच आत्महत्या करता असेल मग देशाची काय हालत असेल? शेतकऱ्यांना भाजपाचे सरकार कर्जमाफी देऊ शकत नाही मग उद्योगपतींची ११ लाख करोडची कर्जही माफ कशी होतात असे प्रश्न उपस्थित करत भाजपा सरकार सामान्य लोकांचे नसून उद्योगपतींसाठी असल्याची टिका येचुरी यांनी केली.

भाजपा सरकार सत्तेवर आल्यापासून धार्मिक तेढ निर्माण झाली आहे. इंडस्ट्रियल प्रोडक्शन कमी झाले आहे. कृषीचे प्रोडक्शन २ टक्क्यावर आले आहे. देशात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नोटबंदीचा असा सर्वत्र दिसत आहे. याचा परिणाम म्हणून अर्थव्यवस्थेवर परिणाम झाले आहेत असे येचुरी म्हणाले. गो रक्षकांनी गायींची रक्षा जरूर करावी पण त्यासाठी लोकांना मारायची गरज काय असा प्रश्न येचुरी यांनी उपास्थीत केला. समृद्धी मार्ग, मुंबई दिल्ली ट्रेन, बुलेट ट्रेन यामुळे लाखो शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत यामधून शेतकऱ्यांना फायदा होणार नसून सरकार काही उद्योगपतींना फायदा करून देत आहे. बहिऱ्या सरकारच्या पुढे आम्ही सामान्य लोकांचे प्रश्न मांडत असून या बहिऱ्या सरकारला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा व शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी भाग पाडू असे येचुरी यांनी सांगितले.

५ जून रोजी शेतकऱ्यांचा 'महाराष्ट्र बंद' -
शेतकरी संपाला दोन दिवस होत असतानाही राज्यसरकारने कर्जमाफी बाबत कोणतीच भूमिका न घेतल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी येत्या ५ जून रोजी मुंबई वगळता महाराष्ट बंदची हाक दिली आहे. तर ६ जून रोजी सर्व सरकारी कार्यालयाला टाळे ठोकण्यात येणार असल्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे. अहमदनगरच्या पुणतांबा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत किसान क्रांती कोअर कमिटीने ही घोषणा केली आहे. त्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांचे आंदोलन पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.

Post Bottom Ad