मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या प्रवाशांना दिलासा -
मुंबई --रोज पश्चिम दुर्तगती महामार्गावरून सुमारे 5 लाख वाहने मुंबईकडे आणि मालाड -दहिसरकडे जातात. विलेपार्ले ते थेट कांदिवली पर्यंत या महामार्गावर महिला व पुरुषांसाठी सुसज्ज शौचालयच नव्हते. त्यातच सध्या अंधेरी ते दहिसर मेट्रोचे काम येथे सुरू असल्यामुळे येथे मोठी वाहतूक कोंडी होये त्यामुळे प्रवाशांना तासंतास गाडीत बसून राहत लागत असल्याने शौचालया अभावी नागरिकांचे आणि विशेषकरून मधुमेह आणि रक्तदाबग्रस्त नागरिकांचे आणि माहिलांचे खूप हाल होत होते. शिवसेनेच्या प्रयत्नामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर गोरेगावच्या हबमॉल जवळ आधुनिक व सुसज्ज शौचालय उभारून शिवसेनेने मधुमेह आणि रक्तदाब रुग्णाना व प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. विलेपार्ले पासून दहिसरच्या दिशेने जाताना नॉर्थ बॉण्ड दिशेला शौचालय असावे म्हणून सध्याचे शिवसेनेचे दिंडोशीचे विद्यमान आमदार आणि विभागप्रमुख सुनील प्रभू हे महापौर असल्यापासूनच प्रयत्नशील होते. जागेच्या अभावी शौचालय उभारणे शक्य नव्हते तसेच सुरुवातीच्या पिडब्लूडीच्या नियमानुसार अनेक अटी असल्यामुळे ही सुविधा नागरिकांना देणे अशक्य होते. त्यामुळे नागरिकांची सुद्धा मोठी गैरसोय होत होती. मुंबई महानगर पालिकेने महामार्गावरील शौचालय उभारण्याच्या बाबतचे धोरण मंजूर केल्या नंतर सुनिल प्रभु यांनी नगरसेवक असल्यापासून याबाबत पाठपुरावा करून सदर कामाचा शुभारंभ केला होता. त्यानंतर या भागात निवडून आलेल्या नगरसेविका साधना माने यांनी देखील उर्वरित काम पूर्ण करून घेतले. या कामासाठी शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तिकर आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे देखील सहकार्य लाभले. पश्चिम दुर्तगती महामार्गावर गोरेगाव हब मॉलजवळील अशोक नगर येथे पालिकेच्या पी दक्षिण विभागाने १००० चौफुट जागेत पुरुष आणि महिलांसाठी आधुनिक व सुसज्ज शौचालय उभारले आहे. आज दुपारी आमदार प्रभू यांच्या हस्ते या शौचालयाचा लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी महिला विभागसंघटक आणि शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका साधना माने यांच्या सह पी दक्षिण विभागाच्या सहाय्यक पालिका आयुक्त राखी जाधव , घनकचरा विभागाचे सहय्यक अभियंता अतुल पाटणे, महिला उपविभागसंघटक पूनम वैद्य, शाखाप्रमुख भोगले शाखा संघटक रजनी नावगे, माजी शाखा संघटक जयश्री चव्हाण, युवासेनेचे अमोल अपराद आणि शिवसैनिक आणि येथील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार प्रभू यांनी आपल्या भाषणात शिवसेना ही मुंबई महानगरपालिकेतील सत्तेचा वापर जास्तीत जास्त मुंबईकरांना नागरी सेवा व सुविधा देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. आज शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे ही शौचालय सेवा उपलब्द झाली असून येथून जाणाऱ्या तमाम वाहनचालक आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईकरांच्या हिताची सेवा सुविधा देणे हे शिवासनेनेचे व्रत घेतले असून शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी तास मापदंडच घालून दिला आहे व शिवसेना प्रमुखांनी घालून दिलेल्या मापदंडाची पुनरावृत्ती करण्याचे व अत्याधुनिक सेवा व सुविधा मुंबईकरांना देण्याचे काम शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे शिवसेनेच्या नगरसेवकांच्या मदतीने मुंबई महापालिकेत करत आहेत. पश्चिम द्रुतगती महामार्गावर हे शौचालय उभारले असून लोकांसाठी खुले करण्यात आले आहे. याचे श्रेय महापालिका अधिकाऱ्यांसोबत शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींचे देखील आहे.
पी दक्षिण विभागाने येथे पंथनाट्य आयोजित करून उघड्यावर शोचालयास बसू नका,स्वच्छ भारत अभियान योजनेला सहकार्य करून आपला परिसर स्वच्छ ठेवा असा संदेश यावेळी दिला.