उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघ : विकासकामे मार्गी लावण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 June 2017

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघ : विकासकामे मार्गी लावण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश


मुंबई, दि. 7 : उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातील विविध विकासकामे त्वरीत मार्गी लावावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातील मोडकळीस आलेल्या इमारती, गृहनिर्माण संस्था यांचा पुनर्विकास करणे, परिसरातील अनेक छोट्या-मोठ्या नगरातील वीज, पाणी, रस्त्यांचा प्रश्न, डिफेन्स लॅण्डचा विकास करणे आदी प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांसमवेत मंत्रालयात बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या भागातील मोडकळीस आलेल्या इमारती, जुन्या गृहनिर्माण संस्था यांचा बीडीडी चाळींच्या धर्तीवर पुनर्विकास करण्यासाठी पायलट प्रोजेक्ट करावा, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

या बैठकीला उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघाच्या खासदार पूनम महाजन, एमएमआरडीएचे आयुक्त यु.पी.एस. मदान, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविणसिंह परदेशी, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Post Bottom Ad