बंद पडलेली ‘झुणका भाकर’ केंद्रे ‘अन्नदाता आहार केंद्राच्या रूपात सुरू होणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बंद पडलेली ‘झुणका भाकर’ केंद्रे ‘अन्नदाता आहार केंद्राच्या रूपात सुरू होणार

Share This

मुंबई / प्रतिनिधी - मुंबईत बंद गेले कित्तेक वर्षे बंद पडलेली झुणका भाकर केंद्रे ‘अन्नदाता केंद्रा’च्या रूपात सुरू केली जाणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीसमोर सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला सत्ताधारी शिवसेना सदर प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास शेकडो बेरोजगार युवकांना हि केंद्रे चालवण्यास मिळणार आहेत.

मुंबईत १२५ चौ. फुटांच्या जागेत हा उपक्रम सुरू करण्यास मिळालेल्या परवानगीमुळे शेकडो बेरोजगारांना रोजगार मिळाल होता. मात्र काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात ही योजना यशस्वी झाली नसल्याचे सांगत २००० मध्ये बंद करण्यात आली. याविरोधात अनेक याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या. मात्र न्यायालयाने या याचिका फेटाळून लावत शासनाचाच निर्णय योग्य ठरवला. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयातही विनंती अर्ज करण्यात आले. मात्र तिथेही विनंती अर्ज फेटाळून लावण्यात आले. यामुळे शेकडो तरुण बेरोजगार झाले. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अधिकारानुसार झुणका भाकर केंद्रे दुसर्‍या नावाने सुरू करण्याचा निर्णय २००९ मध्ये घेण्यात आला. मात्र त्याची अंमलबजावणी झाली नसल्याने शेकडो बेरोजगार हक्काच्या रोजगारापासून वंचित आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना नगरसेवक मंगेश सातमकर स्थायी समितीत बंद झालेली झुणका भाकर केंद्रे अन्नदाता आहार केंद्र नावाने सुरू करावित असा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. अन्नदाता आहार केंद्र या नावाने २१५ अन्नदाता आहार केंद्रे व १२५ शिव वडापाव केंद्र सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार रस्ते, पादचारी मार्ग आणि आरक्षित जागांवर अशा स्टॉल्सना परवानगी देता येणार नाही. मार्गदर्शक तत्त्वानुसार २१५ पैकी महापालिकेच्या जागेवरील ४४ झुणका भाकर केंद्राचे रूपांतर अन्नदाता आहार केंद्रात करण्याचे निर्देश आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages