मुंबई : शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीच्या प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात करण्यात येत आहे. यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे करण्यात येणार आहे. ‘आपले सरकार’ या वेब पोर्टलच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार आहेत. यासाठी राज्यात 25 हजार केंद्र उभारण्यात आली आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये किमान एक केंद्र असणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
सोमवारपासून सुरु होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत. या अर्जासोबत आधार क्रमांक, बँक खात्याची माहिती, कुटुंबाची माहिती व स्वघोषणापत्र द्यावे लागणार आहे. योग्य लाभार्थ्यालाच याचा लाभ मिळावा यासाठी ही प्रक्रिया सुटसुटीत आणि सोपी ठेवण्यात आली आहे. या अधिवेशनात चर्चेला येणाऱ्या सकारात्मक व्यवहार्य सूचनांचा स्वीकार केला जाईल.
यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्र्यांनी दिली. यामध्ये प्रामुख्याने कृषी, गृह, नगरविकास, गृहनिर्माण आदी विभागाशी संबंधित प्रश्न होते. राज्यात दुबार पेरणीचे संकट टळलेले असून जवळपास 88.3 टक्के पेरण्या झाल्या असल्याची माहिती त्यांनी दिली. तूर खरेदीबाबत माहिती सांगताना मुख्यमंत्री म्हणाले, 3 हजार 341 कोटी 32 लाख रुपये म्हणजे सुमारे 93 टक्के रक्कम अदा करण्यात आली आहे.
अधिवेशनात 21 विधेयके -विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात एकूण 21 विधेयके मांडण्यात येतील. यात 14 प्रस्तावित विधेयके, विधान परिषदेतील 7 प्रलंबित विधेयके यांचा समावेश असेल. सकारात्मक चर्चा होऊन त्यातून निश्चितच वंचितांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न शासनाकडून करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. या पत्रकार परिषदेला मंत्री महोदय सर्वश्री चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, दिवाकर रावते, सुभाष देसाई, पांडुरंग फुंडकर, एकनाथ शिंदे, बबनराव लोणीकर, प्रा. राम शिंदे, जयकुमार रावल आणि सुभाष देशमुख आदी उपस्थित होते.
(एक) प्रस्तावित विधेयके -(1) सन 2017 चे विधान सभा विधेयक क्र. .- महाराष्ट्र मुद्रांक (सुधारणा) विधेयक, 2017 (महसूल- नोंदणी व मुद्रांक विभाग) (बॅंका व वित्तीय संस्थांच्या कार्यपद्धतीविषयक बाबींमध्ये सुस्पष्टता आणण्याकरिता अशा संस्था ज्या संलेखाच्या संदर्भात एक पक्षकार असतील तेथे मुदांक शुल्क भरण्यासंदर्भातील तरतुदीमध्ये सुधारणा करणे, जेथे संलेखातील दुस-या पक्षकाराने मुद्रांक शुल्क भरले असेल तेथे अशा वित्तीय संस्थाना मुद्रांक शुल्क भरावे लागणार नाही अशी तरतूद करणे (नवीन विधेयक)
(2) सन 2017 चे विधान सभा विधेयक क्र. .- महाराष्ट्र जमीन महसूल संहिता आणि महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरात बदल करणे आणि अकृषिक मूल्य निर्धारण नियम (सुधारणा) विधेयक, 2017 (महसूल विभाग) (महसूल संहितेच्या कलम 113 नुसार 5 वर्षांच्या कालावधी साठी लागू केलेला अकृषिक आकारणीचा प्रमाण दरामध्ये असा दर हमी कालावधीमध्ये कमी करण्याकरिता तरतुदी) (नवीन विधेयक)
(3) सन 2017 चे विधान सभा विधेयक क्र. .- महाराष्ट्र मुद्रांक (दुसरी सुधारणा) विधेयक, 2017 (महसूल- नोंदणी व मुद्रांक विभाग) (नागरी भागातील स्थावर मालमत्तेच्या हस्तांतरणासाठी 5 टक्के आणि ग्रामीण भागात 3 टक्के मुद्रांक शुल्क आकारण्यासाठी मुद्रांक शुल्क अधिनियमाच्या अनुच्छेद 25 व 34 मध्ये सुधारणा) (नवीन विधेयक)
(4) सन 2017 चे विधान सभा विधेयक क्र.- महाराष्ट्र साक्षीदार संरक्षण व सुरक्षा विधेयक, 2017 (गृह विभाग) (साक्षीदारांच्या संरक्षणासाठी विशेष कायदा करणे) (नवीन विधेयक)
(5) सन 2017 चे विधान सभा विधेयक क्र. - महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था (सुधारणा) विधेयक, 2017 (विधि व न्याय विभाग) (धार्मिक, धर्मादाय किंवा इतर प्रयोजनांसाठी वर्गणी, अंशदान इ. गोळा करण्याकरिता सहाय्यक किंवा उप धर्मदाय आयुक्तांच्या परवानगीबाबत व तदानुषंगिक बाबींकरिता तरतुदी करणे) (नवीन विधेयक)
(6) सन 2017 चे विधान सभा विधेयक क्र. .- महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (सुधारणा) विधेयक, 2017 (पणन विभाग) बाजार समित्यांमध्ये शेतक-यांना जास्तीत जास्त प्रतिनिधित्व देण्याकरिता थेट मताद्वारे संचालक निवडण्याचा अधिकार देणे) (अध्यादेश क्र. 9/2017 चे रुपांतर)
(7) सन 2017 चे विधान सभा विधेयक क्र. .- महाराष्ट्र महानगर पालिका (सुधारणा) विधेयक, 2017 (नगर विकास विभाग) (महानगरपालिका जमिनी चालू बाजारमूल्यापेक्षा कमी मूल्याच्या बदल्यात सार्वजनिक प्रयोजने, शैक्षणिक प्रयोजने, वैद्यकीय प्रयोजने यासारख्या सामाजिक कारणांसाठी देता याव्या तसेच झोपडपट्टी क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेली महानगरपालिकेच्या मालकीची जमीन, पात्र झोपडपट्टीधारकांच्या सहकारी संस्थेला किंवा झोपडपट्टीधारकाला व्यक्तीश:, अधिमूल्य, भाडे किंवा इतर मोबदला यांच्या बाजारमूल्यापेक्षा कमी भाडे घेऊन भाडेपट्ट्याने देण्याची तरतूद करणे) (अध्यादेश क्र. 10/2017 चे रुपांतर)
(8) सन 2017 चे विधान सभा विधेयक क्र. - महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता (सुधारणा) अध्यादेश, 2017 (ग्रामविकास विभाग) (स्थानिक प्राधिकरण - महानगरपालिका, जिल्हा परिषदा इ. चा सदस्यास पक्षांतराच्या कारणाने अनर्ह ठरविणारा आदेश आयुक्त किंवा जिल्हाधिकारी यांनी काढला असेल त्याबाबतीत अशा सदस्याला अशा आदेशाच्या दिनांकापासून तीस दिवसांच्या आत राज्य शासनाकडे अपील दाखल करता येईल अशी तरतूद करणे) (अध्यादेश क्र. 11/2017 चे रुपांतर)
(9) सन 2017 चे विधान सभा विधेयक क्र. ..- श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी) (सुधारणा) विधेयक, 2017 (विधी व न्याय विभाग) (विश्वस्तव्यवस्थेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेमधील अधिका-याची नियुक्ती, श्री साईबाबा समाधी शतक महोत्सवी वर्षसोहळा व तदनुषंगिक बाबींकरिता तरतुदी करणे) (अध्यादेश क्र. 12/2017 चे रुपांतर)
(10) सन 2017 चे विधान सभा विधेयक क्र. -महाराष्ट्र मोटार वाहन कर (सुधारणा) विधेयक, 2017 (परिवहन विभाग) (वाहन नोंदणी साठी आकारल्या जाणा-या एकरकमी करामध्ये वाढ करणे) (अध्यादेश क्र. 14/2017 चे रुपांतर)
(11) सन 2017 चे विधान सभा विधेयक क्र. -महाराष्ट्र दारुबंदी (सुधारणा) विधेयक, 2017 (उत्पादन शुल्क विभाग) (ग्राम रक्षक दलांच्या स्थापनेची बैठक तहसीलदारांनी नेमलेल्या अधिका-यांच्या उपस्थितीत घेण्याकरिता तरतुदी) (अध्यादेश क्र. 15/2017 चे रुपांतर)
(12) सन 2017 चे विधान सभा विधेयक क्र. -महाराष्ट्र ग्रामपंचायत (सुधारणा) अध्यादेश, 2017 (ग्रामविकास विभाग) (सरपंचाची थेट निवडणुकीद्वारे निवड करणे) (अध्यादेश क्र. 16/2017 चे रुपांतर)
(13) सन 2017 चे विधान सभा विधेयक क्र. -महाराष्ट्र (पुरवणी) विनियोजन विधेयक, 2017 (वित्त विभाग) (सन 2017-2018 या वर्षाकरिता पुरवणी मागण्या) (वैधानिक कामकाज)
(14) सन 2017 चे विधान सभा विधेयक क्र. -महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत (सुधारणा) विधेयक, 2017 ( महसूल विभाग) (15 नोव्हेंबर 1965 नंतर करण्यात आलेले जमिनीचे तुकड्यांचे व्यवहार नियमित करण्याबाबत तरतुदी) (नवीन विधेयक)
(दोन) प्रलंबित विधेयके -
(अ) विधान परिषदेत प्रलंबित -
(1) सन 2017 चे विधान सभा विधेयक क्र. 2.- मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, 2017 (अनधिकृत इमारतींवर बसविण्यात येणारी शास्तीच्या रकमेत सुधारणा करण्यासाठी अशी शास्ती मालमत्ता कराच्या दुप्पटीऐवजी महानगरपालिका ठरवील अशी असेल अशी तरतूद करणे) (अध्यादेश क्र. 3/ 2017 चे रुपांतर) (नगर विकास विभाग) (पुर:स्थापित दि. 06.03.2017- विचारार्थ दि. 07/08/09/10- संमत15.03.2017- विधान परिषदेत विचारार्थ दि. 16/17/22/23/24/25/29/30/31.03.2017 -01/05/06.04.2017)
(2) सन 2017 चे विधान सभा विधेयक क्र. 4 .- मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक, 2017 (महानगर पालिका व नगर परिषदा यांच्या निवडणूक लढविणा-या उमेदवारांना शौचालय वापराचे स्वयं- प्रमाणपत्र देण्याबाबत तरतुदी) (अध्यादेश क्र. 6/ 2015 चे रुपांतर) (नगर विकास विभाग) (पुर:स्थापनार्थ दि. 08/09/10- पुर:स्थापित 15.03.2017- विधान सभेत संमत दि. 16.03.17- विधान परिषदेत विचारार्थ दि.22/23/24/25/29/30 /31.03.2017-01/05/06.04.2017)
(3) सन 2017 चे विधान सभा विधेयक क्र. 10 .- भारतीय भागीदारी (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2017 (नवीन विधेयक) (भागीदारी संदर्भातील आवश्यक सूचना निबंधकाकडे न देणा-या भागीदारांना नोंदणी शुल्क व दंडाच्या तरतुदीत सुधारणा) (नवीन विधेयक) (विधि व न्याय विभाग) (पुर:स्थापित दि. 23.03.2017- विधान सभेत संमत दि. 24.03.2017- विधान परिषदेत विचारार्थ दि. 25/29/30 /31.03.2017 -01/05.04.2017)
(4) सन 2017 चे विधान सभा विधेयक क्र. 12 .-शिकाऊ उमेदवार (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2017 (शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण कार्यक्रमाची अधिक प्रभावी अंमलबजावणी करणे, शिकाऊ उमेदवारांना कामाचे प्रशिक्षण देऊन त्याद्वारे प्रशिक्षित मनुष्यबळ वाढविणे, अंशकालिक प्रशिक्षण देण्याकरिता प्रोत्साहनपर तरतुदी तसेच प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना कार्यनिपुणता प्रमाण पत्र देणे इ. बाबत तरतुदी) (नवीन विधेयक) (कौशल्य व उद्योजकता विकास विभाग) (पुर:स्थापित दि. 24.03.2017- विधान सभेत संमत दि. 25.03.2017) (विधान परिषदेत विचारार्थ दि. 29/30 /31.03.2017 -01/05/06.04.2017)
(5) सन 2017 चे विधान सभा विधेयक क्र. 16 .- महाराष्ट्र सहकारी संस्था (दुसरी सुधारणा) विधेयक, 2017 (सहकारी पतसंस्थांचे नियमन करण्याबाबत तरतुदी) (नवीन विधेयक) (सहकार विभाग) (पुर:स्थापित दि. 25.03.2017- विधान सभेत संमत दि. 29.03.2017- विधान परिषदेत- विचारार्थ दि. 30 /31.03.2017-01/05/06.04.2017)
(6) सन 2017 चे विधान सभा विधेयक क्र. 20.- भारतीय दंड संहिता आणि फौजदारी प्रक्रीया संहिता (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2017 (नवीन विधेयक) (लोकसेवकांच्या संदर्भातील भारतीय दंड संहितेमधील कलमे 332 व 353 याखालील गुन्ह्यांबाबात कडक शिक्षेची तरतूद करणे, अशा गुन्हे सत्र न्यायालयात चालविले जातील अशी तरतूद करण्याकरिता फौजदारी प्रक्रीया संहितेमध्ये सुधारणा) (गृह विभाग) (पुर:स्थापित दि. 31.03.2017- विधान सभेत संमत दि. 01.04.2017- विधान परिषदेत विचारार्थ दि. 05/06.04.2017)
(7) सन 2017 चे विधान सभा विधेयक क्र. 24 .- महाराष्ट्र विधानमंडळ सदस्य (निरर्हता दूर करणे) (सुधारणा) विधेयक, 2017 (शासकीय मुख्य प्रतोद व प्रतोद पद धारण करणारे विधान मंडळ सदस्य लाभाचे पद धारण केल्यामुळे अनर्ह होणार नाहीत अशी तरतुद करणे) (नवीन विधेयक) (संसदीय कार्य विभाग) (पुर:स्थापित दि. 01.04.2017- विधान सभेत संमत दि. 05.04.2017- विधान परिषदेत प्रलंबित दि. 0७.04.2017)
(ब ) विधान सभेत प्रलंबित विधेयके -
(तीन) प्रख्यापित अध्यादेश -
(1) सन 2017 चा महाराष्ट्र अध्यादेश क्र. 8 .- मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा व पुढे चालू ठेवणे) अध्यादेश, 2017 (महानगर पालिका व नगर परिषदा यांच्या निवडणूक लढविणा-या उमेदवारांना शौचालय वापराचे स्वयं- प्रमाणपत्र देण्याबाबत तरतुदी) (कृपया सन 2017 चे वि.स.वि. क्र. 4 पहावे)
(2) सन 2017 चा महाराष्ट्र अध्यादेश क्र. 9 .- महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (सुधारणा) अध्यादेश, 2017 (पणन विभाग) बाजार समित्यांमध्ये शेतक-यांना जास्तीत जास्त प्रतिनिधित्व देण्याकरिता थेट मताद्वारे संचालक निवडण्याचा अधिकार देणे)
(3) सन 2017 चा महाराष्ट्र अध्यादेश क्र. 10 .- महाराष्ट्र महानगर पालिका (सुधारणा) अध्यादेश, 2017 (नगर विकास विभाग) (महानगरपालिका जमिनी चालू बाजारमूल्यापेक्षा कमी मूल्याच्या बदल्यात सार्वजनिक प्रयोजने, शैक्षणिक प्रयोजने, वैद्यकीय प्रयोजने यासारख्या सामाजिक कारणांसाठी देता याव्या तसेच झोपडपट्टी क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेली महानगरपालिकेच्या मालकीची जमीन, पात्र झोपडपट्टीधारकांच्या सहकारी संस्थेला किंवा झोपडपट्टीधारकाला व्यक्तीश:, अधिमूल्य, भाडे किंवा इतर मोबदला यांच्या बाजारमूल्यापेक्षा कमी भाडे घेऊन भाडेपट्ट्याने देण्याची तरतूद करणे)
(4) सन 2017 चा महाराष्ट्र अध्यादेश क्र. 11 .- महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता (सुधारणा) अध्यादेश, 2017 (ग्रामविकास विभाग) (स्थानिक प्राधिकरण - महानगरपालिका, जिल्हा परिषदा इ. चा सदस्यास पक्षांतराच्या कारणाने अनर्ह ठरविणारा आदेश आयुक्त किंवा जिल्हाधिकारी यांनी काढला असेल त्याबाबतीत अशा सदस्याला अशा आदेशाच्या दिनांकापासून तीस दिवसांच्या आत राज्य शासनाकडे अपील दाखल करता येईल अशी तरतूद करणे)
(5) सन 2017 चा महाराष्ट्र अध्यादेश क्र.12.- श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी) (सुधारणा) अध्यादेश, 2017 (विधी व न्याय विभाग) (विश्वस्तव्यवस्थेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेमधील अधिका-याची नियुक्ती, श्री साईबाबा समाधी शतक महोत्सवी वर्षसोहळा व तदनुषंगिक बाबींकरिता तरतुदी करणे)
(6) सन 2017 चा महाराष्ट्र अध्यादेश क्र..13.- मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा व दुस-यांदा पुढे चालू ठेवणे) अध्यादेश, 2017 (नगर विकास विभाग) (अनधिकृत इमारतींवर बसविण्यात येणारी शास्तीच्या रकमेत सुधारणा करण्यासाठी अशी शास्ती मालमत्ता कराच्या दुप्पटीऐवजी महानगरपालिका ठरवील अशी असेल अशी तरतूद करणे) (कृपया सन 2017 चे वि.स.वि. क्र.2 पहावे)
(7) सन 2017 चा महाराष्ट्र अध्यादेश क्र.14.- महाराष्ट्र मोटार वाहन कर (सुधारणा) अध्यादेश, 2017 (परिवहन विभाग) (वाहन नोंदणी साठी आकारल्या जाणा-या एकरकमी करामध्ये वाढ करणे)
(8) सन 2017 चा महाराष्ट्र अध्यादेश क्र.15..- महाराष्ट्र दारुबंदी (सुधारणा) अध्यादेश, 2017 (उत्पादन शुल्क विभाग) (ग्राम रक्षक दलांच्या स्थापनेची बैठक तहसीलदारांनी नेमलेल्या अधिका-यांच्या उपस्थितीत घेण्याकरिता तरतुदी)
(9) सन 2017 चा महाराष्ट्र अध्यादेश क्र.16- महाराष्ट्र ग्रामपंचायत (सुधारणा) अध्यादेश, 2017 (ग्रामविकास विभाग) (सरपंचाची थेट निवडणुकीद्वारे निवड करणे)