लोकप्रतिनिधींच्या कार्यात स्वीय सहायकांचा महत्वाचा वाटा - मुख्यमंत्री - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

लोकप्रतिनिधींच्या कार्यात स्वीय सहायकांचा महत्वाचा वाटा - मुख्यमंत्री

Share This

मुंबई : लोकप्रतिनिधींच्या कार्यात स्वीय सहायकांचा वाटा महत्वाचा आहे. स्वीय सहायक हे लोकप्रतिनिधीची प्रतिमा मेकही (Make) करु शकतात आणि ब्रेकही (Break) करु शकतात. त्यामुळे स्वीय सहायकांनी लोकप्रतिनिधींबरोबर काम करीत असताना आपले काम जबाबदारीने करणे अत्यंत आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि संसदीय कार्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सन्माननीय सदस्यांच्या स्वीय सहायकांसाठी एकदिवसीय अभ्यासवर्गाचे आयोजन विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार राज पुरोहित, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव उत्तमसिंग चव्हाण, टाइम्स ऑफ इंडियाचे वरिष्ठ पत्रकार प्रफुल्ल मारपकवार आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, स्वीय सहायकांनी आपले काम प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने करावे. स्वीय सहायक हे पद लोकांच्या कल्याणासाठी असून स्वीय सहायकांनी समाज सेवेसाठी काम करावे. बापट यांनी सांगितले की, स्वीय सहायक हे लोकप्रतिनिधींचे विस्तारीत कान, हात आणि डोळे असतात. त्यांच्या महत्वपूर्ण मदतीमुळे लोकप्रतिनिधींना आपले काम करणे सोपे जाते. स्वीय सहायकांच्या विविध मागण्यांचा विचार करण्यात येईल.

यावेळी वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने यांचे संकलन आणि लेखन असलेल्या ‘लोकप्रतिनिधींसाठी लोकसंपर्क-स्वीय सहायकांचे कर्तव्य आणि जबाबदारी’ या पुस्तिकेचे प्रकाशनही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि व्यासपीठावरील उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages