
मुंबई, दि. 24 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहाय्यता निधीस (शेतकरी कर्जमाफी) आर्थिक सहाय्य देण्याचे राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी निश्चित केले होते. त्यानुसार त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 25 लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.
यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर,ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे,पर्यटन मंत्री जयकुमार रावल, राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर उपस्थित होते. यापूर्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी, मेंढी विकास महामंडळ आणि महाराष्ट्र मत्स्यविकास महामंडळ तोट्यात होते. पदुम मंत्री पदसिद्ध अध्यक्ष असलेल्या या महामंडळाचा कार्यभार जानकर यांनी स्वीकारल्यानंतर त्यांनी घेतलेल्या विविध योग्य निर्णयांमुळे ही दोन्ही महामंडळे नफ्यात आली आहेत. या महामंडळांच्या नफ्यातून हा निधी मुख्यमंत्री सहायता निधीस देण्यात आल्याचे जानकर यांनी सांगितले.