मुंबई / प्रतिनिधी -
मुंबईत आणि मुंबई महापालिकेत राजकीय पक्षांद्वारे राजकारण केले जात असून रोज नेहमी नाटकाचा नवीन अंक पाहायला मिळतात आहे. या नाटकात सामान्य मुंबईकर नागरिकांना रस नसून त्यांना कचरा, पाणी, आरोग्य त्यांना सुविधा हव्या आहेत. या सुविधा मिळाव्यात म्हणून पालिका आयुक्तांची भेट घेतली असून त्याबाबत पालिका आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेतल्याची माहिती राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र प्रदेश महिला विभागाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी दिली. वाघ यांच्या नेत्रुत्वात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई अध्यक्षा सुरेखा पेडणेकर, पालिकेतील गटनेत्या राखी जाधव आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होत्या. या भेटी नंतर वाघ पत्रकारांशी बोलत होत्या.
यावेळी मुंबईमध्ये आजारांचे प्रमाण वाढले आहे, पालिकेच्या आकडेवारीनुसर हे प्रमाण कमी असले तरी खाजगी रुग्नालयातील रुग्णाची संख्या पाहिल्यास हि संख्या दिडपट आहे. आजारांचे प्रमाण वाढत असताना रुग्णालयात जीवरक्षक औषधांचा तुटवडा आहे यामुळे अतिदक्षता व आयसीयू मधील रुग्णांचे हाल होत असल्याचे वाघ यांनी सांगितले. रुग्णालयात जीवरक्षक औषधेच नसतील तर पालिका काय करते असा प्रश्न वाघ यांनी उपस्थित केला. पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये योग्या औषधसाठा उपलब्ध नसून लोकांचा पालिकेच्या हॉस्पिटलवरून भरोसा उठलाय अशी टीका त्यांनी केली. महानगरपालिकेकडे जे प्रसुतीग्रुह उपलब्ध आहे तेथे गावगुंडांनी हैदोस घालताय. अशामध्ये महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मुंबईमध्ये पाण्याचा अपुरा पुरवठा होत आहे, अनेक ठिकाणी रात्री पाणी पुरवठा होत आहे यामुळे नोकरदार महिलांना रात्रीचे जागून पाणी भरावे लागत असल्याने महिलांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे वाघ म्हणाल्या. १ सप्टेंबर पासून सोसायटी मध्ये कचरा वर्गीकरण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासाठी लागणारी जागा अनेक ठिकाणी नाही, असा कचरा वर्गीकरण करणे हि पालिकेची जबाबदारी असल्याची आठवण आयुक्तांना करून देण्यात आल्याचे वाघ यांनी सांगितले.