पावसाने मुंबईला झोडपले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पावसाने मुंबईला झोडपले

Share This
मुंबई / प्रतिनिधी - पावसाने मागील तीन दिवसापासून मुंबई पुन्हा हजेरी लावली आहे. सोमवारी शहर तसेच उपनगरांत पडलेल्या संततधार पावसाने मुंबईकरांना चांगलेच झोडपून काढले. सोसाट्याच्या वा-यासह पडणा-या पावसामुऴे सकल भागात पाणी साचले. अनेक ठिकाणी वाहतूकीवर परिणाम झाला. पूर्व उपनगरांत पावसाचा जोर जास्त होता. गेल्या २४ तासात मुंबई शहरात २८.१४ मि.मी तर पूर्व उपनगरात ३३.४९ मि.मी आणि पश्चिम उपनगरात २३.९९ मि.मि. पाऊस पडला. 
सोमवारी दिवसभर पावसाचा जोर कायम होता. सकाळपासूनच पावसाची संततधार दिवसभर सुरु राहिली. कुर्ला, शीव, घाटकोपर, विक्रोळी, कांदिवली, दादर, परळ आदी सकल भागात पाणी साचले होते. रेल्वे वाहतूक उशिराने सुरू होती. शिवाय रस्त्यावरील वाहतूकीवरही परिणाम झाल्याने चाकरमान्यांचे हाल झाले. समुद्राला भरती नसल्याने साचलेल्या पाण्याचा निचरा झाला. शिव़डी येथील मोहम्मद चाळीतील दोन खोल्याच्या पोटमाळ्याचा भाग कोसळला. यात लतिफ खान(23) व गौतम पडलकर (22) हे दोघे जखमी झाले. उपचारासाठी त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान येत्या 24 तासांत मुंबई व उपनगरांत पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबई शहरा ३ तर पश्चिम उपनगरात २ अशा पाच ठिकाणी शाॅर्टसर्किट तर विविध १८ ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना झाल्या.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages