
मुंबई - मुंबई आणि उपनगरात गेल्या २४ तासात मुसळधार बरसलेल्या पावसामुळे विक्रोळी येथे इमारत कोसळून एक जण ठार झाला आहे, तर विक्रोळी भागातच सूर्यानगर येथे दरड कोसळून दोघे जण मृत्युमुखी पडले आहेत. विक्रोळीच्या वर्षानगर भागातली ही दोन मजली इमारत आहे. ती कोसळून एक जण ठार तर दोघे जखमी आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.