मुंबईतील पावसात दोघे वाहून गेले तर 5 मृत - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईतील पावसात दोघे वाहून गेले तर 5 मृत

Share This

मुंबई - मुंबईत मंगळवारी मुसळधार पाऊस झाला. या मुसळधार पावसात दोघे जण वाहून गेले असून झालेल्या इतर 5 जण विविध दुर्घटनांमध्ये मृत झाले आहेत. मुंबईमधील पाणी ओसरल्यानंतर या घटना समोर आल्या आहेत.

मुसळधार पावसामुळे मंगळवारी सकाळी सायनच्या गांधी मार्केट परिसरात बंद कारमध्ये एका वकिलाचा मृतदेह सापडला आहे. प्रितेश (३०) असे या वकिलाचे नाव आहे. दुपारी सायन पोलिसांना एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत कारमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गाडीचा दरवाजा तोडून प्रितेश यांना बाहेर काढले. त्यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. पावसामुळे गाडीत अडकून पडल्याने गुदमरुन प्रितेश यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

तर बॉम्बे हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. दीपक अमरापूरकर हे बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. डॉ. अमरापूरकर मंगळवारी दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारात बॉम्बे हॉस्पिटलमधून प्रभादेवी परिसरातील आपल्या राहत्या घरी जाण्यासाठी निघाले होते. साचलेल्या पाण्याचा निचरा व्हावा, यासाठी उघड्या ठेवण्यात आलेल्या गटारातून अमरापूरकर वाहून गेल्याचे समजते. डॉ. अमरापूरकर गेल्या 18 तासांहून अधिक काळ बेपत्ता असून याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलिसांना केवळ त्यांची छत्री सापडली असून त्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

विक्रोळीत पार्क साईट येथील वर्षानगर भागातील संरक्षण भिंत कोसळल्याने कल्याणी जंगम या २ वर्षाच्या लहान मुलीचा मृत झाला आहे. या दुर्घटनेत तिचे आईवडील गोपाळ जंगम व छाया जंगम हे दोघे जखमी झाले आहेत. असल्फा येथील रिलायंस सबस्टेशन भिंत कोसळल्याने रामेश्वर गणेश तिवारी या 42 वर्षांच्या इसमाचा मृत्यू झाला असून त्याची पत्नी मंजू तिवारी ४२ वर्षे व मुलगा कृष्णा वय ९ वर्षे हे दोघे गंभीर जखमी जाहले आहेत. तर विक्रोळी सूर्यनगर येथील पंचशील नगरात एका झोपडीवर चार झोपड्या कोसळल्याने अर्जुन मोर्या ४० या वर्षीय इसमाचा तसेच निखिल राजेंद्र कुमार या २ वर्षीय लहान मुलाचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत किरणकुमार मौर्या वय वर्षे ३५ हा इसम जखमी झाला आहे. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages