पालिका मुख्यालयातील सुरक्षा रक्षकांच्या कॅबिनमध्ये पाणी साचले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिका मुख्यालयातील सुरक्षा रक्षकांच्या कॅबिनमध्ये पाणी साचले

Share This

मुंबई । प्रतिनिधी
मुंबईत कुठेही पाणी साचले नाही असा दावा करणाऱ्या पालिकेच्या मुख्यालयातच पाणी साचल्याचा प्रकार उघड झाला आहे. मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील सुरक्षा रक्षकांच्या चेंजिग रूममध्ये पाणी साचल्याने सुरक्षा रक्षकांची तारांबळ उडाली होती. मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात सात नामावर गेट जवळ सुरक्षा रक्षकांची चेंजिंग रुम आहे. या रुममध्ये सुरक्षा रक्षक आपली ड्युटी सुरु होण्या आधी व ड्युटी संपल्या नंतर आपला गणवेश बदली करत असतात. सोमवारी कोसळलेल्या पावसामुळे या चेंजिंग रूममध्ये पाणी साचले होते. या साचलेल्या पाण्यामधून वाट काढत सुरक्षा रक्षकांना टेबलावर चढून आपले गणवेश बदलावे लागत होते. या रूममध्ये पाणी साचल्याने सुरक्षा रक्षकांना पेव्हर ब्लॉक व सिमेंटचे ब्लॉक या कॅबिनमध्ये ये जा करावी लागत होती. पुरुष आणि महिला सुरक्षा रक्षकांनाही साचलेल्या पाण्याचा त्रास सहन करावा लागला. महापालिका मुख्यालयातील सुरक्षा रक्षकांच्या चेंजींग रूममध्ये दरवर्षी असेच पाणी साचते. सुरक्षा रक्षकांना दरवर्षी असाच त्रास सहन करावा लागतो. अशी माहीती सुरक्षा रक्षकांनी दिली. या ठिकाणी दरवर्षी पाणी साचत असल्याने पालिका प्रशासनाने याचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी सुरक्षा रक्षकांकडून केली जात आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages