श्री संत सेवालाल महाराज तीर्थक्षेत्राच्या २५ कोटीच्या विकास आराखड्यास मान्यता - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 August 2017

श्री संत सेवालाल महाराज तीर्थक्षेत्राच्या २५ कोटीच्या विकास आराखड्यास मान्यता


मुंबई - श्री संत सेवालाल महाराज, पोहरादेवी (ता. मानोरा, जि. वाशिम) तसेच श्री मुंगसाजी महाराज समाधी स्थळ, धामणगाव (ता. दारव्हा, जि. यवतमाळ) ही दोन तीर्थक्षेत्रे आणि स्व. यशवंतराव चव्हाण स्मारक (सातारा) व स्वातंत्र्य सैनिक कै. पांडू मास्तर उर्फ पांडुरंग गोविंद पाटील स्मारक, येडेनिपाणी (ता. वाळवा, जि. सांगली) या दोन स्मारकांच्या विकास आराखड्यास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने मान्यता दिली. 

शिखर समितीची बैठक सह्याद्री राज्य अतिथीगृहामध्ये आज झाली. यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, सहकार मंत्री सुभाष देशमुख, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजय पाटील, आमदार राजेंद्र पटणे,आमदार शिवाजीराव नाईक, मुख्य सचिव सुमित मल्लिक उपस्थित होते.

श्री संत सेवालाल महाराज तीर्थक्षेत्र विकासासाठी २५ कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली. यामध्ये भक्त निवास बांधकाम- २ कोटी ५५ लाख ३८ हजार रुपये, संरक्षण भिंतीचे बांधकाम- १ कोटी २ हजार रुपये, प्रदर्शन केंद्र- १४ कोटी ६४ लाख ४२ हजार रुपये,अंतर्गत रस्त्याचे बांधकाम- ९६ लाख ४९ हजार रुपये, सभामंडपाचे बांधकाम- २कोटी४० लाख २ हजार रुपये, जमिनीचे सपाटीकरण, बगीचा व सौंदर्यीकरण- ३ कोटी ४६ लाख ५०हजार रुपये इतक्या खर्चाच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली. यापेक्षा अधिक लागणारा खर्च तीर्थक्षेत्र ट्रस्टने करावा असे ठरले.

श्री मुंगसाजी महाराज समाधी स्थळ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी निधी - 
श्री मुंगसाजी महाराज समाधी स्थळ तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या अनुषंगाने प्रथम टप्प्यात उच्चाधिकार व शिखर समितीने ६ कोटींचा निधी तातडीच्या कामांसाठी वितरीत केला होता. त्यानुसार त्यातील बहुतांश कामे पूर्ण झाली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. तीर्थक्षेत्र आराखड्यासाठी २५ कोटी रुपयांच्या रकमेची मर्यादा असल्याने उर्वरित १९ कोटी ४७ लाख रुपये खर्चाचा आराखडा मान्यतेसाठी ठेवण्यात आला. त्यास शिखर समितीने मान्यता दिली. यामध्ये दर्शन बारीचे बांधकाम- २० लाख रुपये, सामुहिक प्रसाधनगृहे- ८२ लाख रुपये,सभामंडप- ८० लाख रुपये, भोजन कक्ष बांधकाम- १ कोटी ६१ लाख, बाल उद्यान व शेडसह इतर बांधकाम- १ कोटी ७४ लाख, भक्त निवास (मुख्य मंदिर परिसर)- ३ कोटी ५० लाख रुपये,भक्त निवास (चिंच मंदिर परिसर)- ५० लाख रुपये, सी.सी.टी.व्ही. कॅमेरे व पोलीस चौकीचे बांधकाम- २० लाख रुपये, धामणगाव (देव) येथे येणाऱ्या पोच मार्गांचे बांधकाम- १ कोटी ५०लाख रुपये, स्वागत कक्ष व लॉकर कार्यालय बांधकाम- २५ लाख रुपये, आरोग्य सुविधा केंद्र व इतर सुविधांचे बांधकाम- १ कोटी ७५ लाख रुपये, बस स्थानकाचे बांधकाम- ३० लाख रुपये,संरक्षण भिंत- ६० लाख रुपये, पाणी पुरवठा व्यवस्था- ३ कोटी रुपये, विद्युत पुरवठा व्यवस्था-१ कोटी ५० लाख रुपये, तज्ज्ञ सल्लागार खर्च- ७३ लाख रुपये इतक्या खर्चाच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली.

Post Bottom Ad

JPN NEWS