मध्य वैतरणा तलाव भरण्याच्या मार्गावर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 August 2017

मध्य वैतरणा तलाव भरण्याच्या मार्गावर

मुंबई | प्रतिनिधी - 17 August 2017 - 
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव परीसरात सध्या चांगला पाऊस पडत आहे. पाणी पुरवठा करणार् या सात तलावांपैकी तीन तलाव आतापर्यंत भरले आहेत. तर चौथा मध्य वैतरणा तलाव हा भरण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी मोडक सागर तलाव १५ जुलै रोजी सकाळी ६.३२ वाजता, तानसा तलाव १८ जुलै रोजी सायंकाळी ४.५५ वाजता, तुळशी तलाव - १४ ऑगस्ट रोजी भरुन वाहू लागला आहे.

आज सकाळी ६ वाजेपर्यंत महापालिकेकडून प्राप्त माहितीनुसार , मध्य वैतरणा तलावाची क्षमता २८५ मीटर इतकी असून सध्याची पाणी पातळी २८४. ७६ मीटर इतकी आहे. आज या तलावात १,९३, १५२ दशलक्ष लीटर इतका पाणीसाठा जमा आहे. येत्या २४ तासांत पावसाचा जोर राहिल्यास कोणत्याही क्षणी हा तलाव भरुन वाहू लागेल. तसेच अप्पर वैतरणा तलावही भरण्याच्या मार्गावर आहे. तसेच विहार तलाव आणि भातसा तलावही भरण्याच्या मार्गावर आहे. आजच्या तारखेला पाणीपुरवठा करणार् या सातही तलावात एकूण १३,२५,१७२ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा आहे. मुंबईला पावसाळा संपल्यानंतर पुढील वर्षभरासाठी १४, ४७, ३६३ दशलक्ष लीटर इतक्या पाणीसाठ्याची आवश्यकता असते. 

Post Bottom Ad