रेल्वे स्थानकांमध्ये डिसेंबपर्यंत २५०९ सीसीटीव्ही बसवण्यात येणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रेल्वे स्थानकांमध्ये डिसेंबपर्यंत २५०९ सीसीटीव्ही बसवण्यात येणार

Share This

मुंबई । प्रतिनिधी -
पश्चिम रेल्वेवर एका तरुणीला बघून एक तरुण असतील चाळे करत असल्याचा तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे जून महिन्यात तपोवन एक्स्प्रेसमध्ये एक तरुण एका तरुणीकडे पाहत अश्लील चाळे करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महिलांबरोबर होणारे असे प्रकार रोखण्यासाठी आणि रेल्वे स्थानक परिसरातील गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी डिसेंबपर्यंत मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकांच्या परिसरात निर्भया निधीअंतर्गत २५०९ सीसीटीव्ही बसवण्यात येतील, अशी माहिती रेल्वे सुरक्षा विभागाकडून देण्यात आली आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात सध्या २९०० पेक्षा जास्त सीसीटीव्ही आहेत. रेल्वे प्रवाशांबरोबरच महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्हींची संख्या वाढविण्यावर रेल्वेने भर दिला आहे. त्यानुसार मध्य रेल्वेच्या सीएसटी ते इगतपुरी, लोणावळा आणि पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते डहाणू, वापीपर्यंत या मुंबई विभागात असणाऱ्या स्थानकांत सीसीटीव्हींची संख्या वाढवण्यात येईल. निर्भया निधी वापरून मध्य रेल्वेवर आणखी २१३९ सीसीटीव्ही बसवण्यात येतील. यासाठी जवळपास ७४ स्थानकांची निवड करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेवरील स्थानकातही निर्भया निधीचा वापर करत ३७० सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages