तुळशी तलाव भरुन वाहू लागला - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

तुळशी तलाव भरुन वाहू लागला

Share This

मुंबई / प्रतिनिधी - मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रात चांगला पाऊस पडत आहे. मोडक सागर व तानसा हि दोन धरणे भरल्या नंतर १४ ऑगस्‍ट, २०१७ रोजी सकाळी ६.०० वाजल्यापासून तुळशी तलाव भरून वाहू लागले आहे. गतवर्षी हा तलाव दिनांक १९ जुलै, २०१६ रोजी ओसंडून वाहू लागला होता.

मोडक सागर धरण भरल्याने १८ जुलैला सकाळी ६.३२ वाजता धरणाचे दोन गेट उघडण्यात आले होते. मोडक सागर पाठोपाठ तानसा धरणही १८ जुलैला सायंकाळी ४.५५ वाजता ओसंडून वाहू लागला. मुंबईला वर्षभर चांगला पाणी पुरवठा होण्यासाठी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणामध्ये १ ऑक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार ३६३ दश लश लिटर पाणीसाठा असणे अवाश्यक आहे. १४ ऑगस्टच्या पहाटे ६ वाजताच्या पाण्याच्या अहवालाप्रमाणे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये १२ लाख ८९ हजार ९०७ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages