अनियमित शिक्षक भरती करणा-या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार - विनोद तावडे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अनियमित शिक्षक भरती करणा-या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार - विनोद तावडे

Share This

मुंबई, दि. 10 - राज्यातील शासकीय व खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक भरती अनियमित असल्याचे आढळून आल्यावर ही शिक्षक भरती तात्काळ रद्द करण्यात आली आहे. यासदंर्भातील सर्व गुन्ह्यांची चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत दिली.

राज्यातील शासकीय व खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक भरतीला पूर्णपणे बंदी असताना शिक्षण अधिकाज्यांच्या संगनमताने झालेल्या बेकायदा शिक्षक नेमणुकीबाबत सदस्य विजय वडेट्टीवार यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. त्यास उत्तर देताना तावडे बोलत होते. यावेळी सदस्य अतुल भातखळकर यांनी उपप्रश्न उपस्थित केला होता.

तावडे म्हणाले, शिक्षकांची पदभरती अनियमीत असून, शिक्षक, संस्थाचालक आणि अधिकारी अशा एकूण ६७अधिका-यांची चौकशी करण्यात येणार आहे. शिक्षकांची नेमणूक तात्काळ रद्द केली आहे. संबंधित अधिका-यांवर विभागीय चौकशी सुरू असून, अंतर्गत बडतर्फी, सेवानिवृत्ती वेतन रोखून धरणे अशी अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. याचबरोबर गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. चौकशी सखोल केल्यानंतरच संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतात. शिक्षण क्षेत्रात अशा प्रकारचे अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असेही तावडे यांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages