मुंबई । प्रतिनिधी -
आपल्या मागण्यांसाठी राज्यभरातील २ लाख कर्मचाऱ्यांनी सोमवार ११ सप्टेंबर पासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला असून मंगळवारी (१२ सप्टेंबर) आझाद मैदानात उग्र निदर्शने करण्यात आहेत. अशी माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती च्या पदाधिकारयांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्रत सुमारे २ लाख अंगणवाडी कर्मचारी कार्यरत आहेत अंगणवाडी सेविकांना दरमहा ५०००तर मदतनिसांना २५०० असे तुटपुंजे मानधन दिले जाते अंगणवाडी कर्मचाऱ्यांची शासनाद्वारे नेमणूक केली जाते मात्र तरीही त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा शासन तयार नाही .त्यांच्याकडून जिल्हा परिषदेची कामे करवून घेतली जातात मात्र त्यांना कामाचा पुरेसा मोबदला दिला जात नाही किमान वेतन अथवा सामाजिक सुरक्षाचा लाभ दिला जात नाही. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमार्फत ६महिने ते ३वर्षे वयोगटातील बालकांना टी एच आर दिला जातो तो अत्यंत निकृष्ट दर्जाचा असतो त्यामुळे बालकांचे कुपोषण वाढले आहे त्यांना पूरक पोषक आहार देण्यासाठी देण्यांत येणाऱ्या रकमेत तिपटीने वाढ करावी अशी आमची मागणी आहे .अंगणवाडी कर्मचाऱयांना जून महिन्यापासून वेतन मिळाले नाही मानधन वाढीसह विविध मागण्यांसाठी अनेकदा आंदोलन केले याबाबत आश्वासन देण्यात आले मात्र त्याची अद्याप पूर्तता झालेली नाही त्यामुळे २लाख अंगणवाडी कर्मचाऱयांनी ११सप्टेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे १२ सप्टेंबर ला आझाद मैदानात उग्र निदर्शने करण्याबरोबरच महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा ,मंत्री तसेच आमदारांची कार्यालये व निवासस्थानांवर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे असेही त्यांनी सांगितले .