लैंगिक छळ पीडितेला नियमानुसार नुकसान भरपाई द्या - विद्या ठाकूर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

लैंगिक छळ पीडितेला नियमानुसार नुकसान भरपाई द्या - विद्या ठाकूर

Share This

मुंबई, दि. १५ : कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाच्या अर्जावर सुनावणी करताना देण्यात येणारी नुकसान भरपाई नागपूर येथील कुमारी ज्योती किसनजी बालपांडे यांना मिळणे आवश्यक आहे. मात्र या प्रकरणात नुकसान भरपाई देणारे हे निवृत्त झाले आहेत. तक्रारदार बालपांडे यांना नुकसान भरपाई मिळण्यास येत असलेल्या अडचणी लक्षात घेता यासंदर्भातील सर्व शासन निर्णय आणि नियम तपासून घेण्याचे आदेश महिला आणि राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी आज दिले.

राज्यातील समस्याग्रस्त व पीडित महिलांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी महिला व बाल विकास राज्यमंत्री विद्या ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली महिला लोकशाही दिनाचे आज मंत्रालयात आयोजन करण्यात आले होते. यावेळी विशेष पोलीस महानिरीशक (प्रशासन) अर्चना त्यागी, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव डॉ. मंजुषा मोळवणे, महिला व बाल विकास विभाग कक्ष अधिकारी सं. सु. गवस तसेच महिला व बाल विकास विभागाचे संबधित अधिकारी उपस्थित होते.

ठाकूर यांनी यावेळी सांगितले, कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ या प्रकरणातील कार्यवाही प्राथम्याने करीत असताना यासंदर्भातील सर्व शासन निर्णय आणि महाराष्ट्र नागरी सेवा नियम तपासून घ्यावे. मंत्रालयात आज आयोजित करण्यात आलेल्या महिला लोकशाही दिनामध्ये एकूण ५ प्रकरणांवर सुनावणी झाली. यामधील दोन प्रकरणासंदर्भात विभागीय स्तरावर कार्यवाही सुरु असल्याने तेथील कार्यवाही पूर्ण झाल्यावर या प्रकरणांवर कार्यवाही करता येणे शक्य आहे. तसेच पुणे येथील हडपसर मधील अनधिकृत बांधकाम त्वरित पाडण्यात यावे अशी मागणी प्रभावती सुभाष वाघुले यांनी विभागीय आयुक्तांकडे केली होती. आता हे बांधकाम पाडण्यात विभागीय स्तरावर कार्यवाही सुरु आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages