चंगेज मुलतानी यांचे नगरसेवक पद रद्द - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

चंगेज मुलतानी यांचे नगरसेवक पद रद्द

Share This

मुंबई । प्रतिनिधी -
मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत बनावट जातप्रमाणपत्र प्रकरणी जोगेश्वरी प्रभाग क्रमांक ६२ चे नगरसेवक चंगेज मुलतानी यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे. मुलतानी यांचे पद रद्द झाल्याची घोषणा शुक्रवारी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पालिका सभागृहात केली. मुलतानी यांच्या पदाबाबत न्यायालयात सुनवाई सुरु असून त्यांचे पद रद्द झाल्याने त्यांच्या प्रभागात दुसऱ्या क्रमांकावर असलेले शिवसेनेचे उमेदवार राजू पेडणेकर याना नगरसेवक मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे लघुवाद न्यायालयाच्या निकालाकडे आता सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

चंगेज मुलतानी हे अपक्ष होते व त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता. सभागृहात सध्या शिवसेनेचे ८४ आणि ४ अपक्ष असे मिळून ८८ जणांचे संख्याबळ आहे. मात्र राजू पेडणेकर यांना नगरसेवक पद मिळाल्यास शिवसेनेचे संख्याबळ तेवढेच असले तरी शिवसेनेचे ८५ नगरसेवक होणार आहेत. यापैकी काँग्रेसच्या २, भाजपाच्या ३, आणि एका अपक्ष नगरसेवकांचे जात प्रमाणपत्र रद्द झाल्याने त्यांचे पद धोक्यात आले आहे. यात प्रभाग क्रमाक ९० च्या काँग्रेसच्या नागरसेविका ट्युलिप मिरांडा , प्रभाग क्रमांक २८ चे काँग्रेसचे नगरसेवक राजपती यादव, प्रभाग क्र. ८१चे भाजपचे नगरसेवक मुरजी पटेल, प्रभाग क्रमांक ७६च्या भाजपच्या नगरसेविका केशरीबेन पटेल, तर प्रभाग क्रमांक ७२चे भाजपचे नगरसेवक पंकज यादव यांचा समावेश आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages