सूर्यकांत वगळ रुग्णालयात शिशु विभाग सुरु करा - रीटा मकवाना - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सूर्यकांत वगळ रुग्णालयात शिशु विभाग सुरु करा - रीटा मकवाना

Share This

मुंबई । प्रतिनिधी -
मुंबई परिसरात लहान मुलांसाठी वाडिया सोडून कोणतेही रुग्णालय नाही. त्यामुळे लहान मुलांवर उपचार करताना नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून सूर्यकांत वगळ प्रसुतीगृहात शिशु विभाग सुरु करावा अशी मागणी भाजपच्या नगरसेविका रीटा मकवाना यांनी केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी महिला व बालकल्याण समिती अध्यक्षा सिंधु मसुरकर यांना दिले आहे.

सूर्यकांत वगळ प्रस्तुतीगृहाची सहा मजली इमारत आहे. यापैकी पहिला आणि दुसरा मजला बेस्ट उपक्रमाला दिला आहे. तिसऱ्या मजल्यावर हेल्थ पोस्ट, पॅथलॅब व प्रस्तुतीगृह आहे. चौथ्या मजल्यावर ऑपरेशन थिएटर ,पाचवा मजला आनंद सेवा संघाला दिला आहे तर सहावा मजला रिकामा आहे. सहाव्या मजल्यावरील जागा उपलब्ध असल्याने नागरिकांची गैरसोय टाळण्यसाठी येथे शिशु विभाग सुरु करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच प्रस्तुतीगृहातील तिसऱ्या, पाचव्या मजल्यावरील दुरुस्तीचे काम करून इमारतीतील सर्व मजले प्रस्तुतीसंदभातील सोयी सुविधांसाठी वापरण्यात यावेत व लेबर बेडची संख्या वाढवून पुरेशी जागा उपलब्ध करण्यात यावी, असे रीटा मकवाना यांनी पात्रात म्हटले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages