"स्वच्छ व निरोगी प्रभागा"साठी नगरसेवक सूर्यकांत गवळी यांचा पुढाकार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

"स्वच्छ व निरोगी प्रभागा"साठी नगरसेवक सूर्यकांत गवळी यांचा पुढाकार

Share This

मुंबई । प्रतिनिधी -
मुंबईत नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे विविध आजार पसरण्याची शक्यता असल्याने महापालिकेने पुढाकार घेत मुंबईत सर्वत्र आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. आजारांवर मात करण्यासाठी स्वच्छता महत्वाची आहे. आपला विभाग स्वच्छ असणे गरजेचे आहे हि संकल्पना नागरिकांच्या मनामनात उतरवण्यासाठी भाजपाचे नगरसेवक व बाजार उद्यान समितीचे सदस्य सूर्यकांत गवळी यांनी पुढाकार घेतला आहे.

घाटकोपर पश्चिम येथील प्रभाग क्रमांक 129 चे नगरसेवक सूर्यकांत गवळी यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण प्रभाग 129 मध्ये कचरा मुक्त अभियान घेत स्वच्छ प्रभाग निरोगी प्रभाग हि संकल्पना आखली आहे. प्रभागात ज्या ज्या ठिकाणी रहिवाशी कचरा टाकतात त्या त्या ठिकाणी बहुतांशी नागरिक कचरा कचरा पेटित टाकत नसल्याने तो कचरा रस्त्यावर पडून प्रभागात दुर्गंधी पसरते त्याचा परिणाम स्थानिकांच्या आरोग्यावर पडतो. यासाठी प्रभागातील नागरिकांनी आपला आपला कचरा बाहेर कुठे हि न टाकता तो दत्तक वस्तीत जमा करणाऱ्या कामगारांकडे द्यावा. कामगार असा कचरा एका मोकळ्या ठिकाणी जमा करून त्याची विल्हेवाट लावतील व त्याठिकाणी ती जागा पावडर आणि पाणी टाकून पुन्हा स्वच्छ करतील. नागरिकांनी अशा प्रकारे सहकार्य केले तर साहजिकच प्रभाग स्वच्छ दिसेल व निरोगी राहील असे नगरसेवक सूर्यकांत गवळी यांनी सांगितले.

सदर अभियान यशस्वी करण्यासाठी नगरसेवक गवळी यांनी एन वार्डच्या सहाय्यक आयुक्त भाग्यश्री कापसे यांची भेट घेऊन याविषयावर चर्चा केली आणि ज्या ज्या ठिकाणी रस्त्यावर कचरा साचेल त्या त्या ठिकाणी कचरा गाड्यांचे फेऱ्यांचे प्रमाण वाढवावे असे निवेदन दिल्याचे गवळी यांनी सांगितले. शनिवारी (९ सेप्टेंबर) सकाळी पालिका अधिकाऱ्यांसह विभागातील कचरा पेट्यांच्या ठिकाणाला भेट देऊन दुर्गंधी पसरणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावता येईल व कचरा कचरापेटीतच कसा साचेल याविषयी उपाययोजना करण्यास सांगितले. दोन आठवड्यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे मुंबईत आजाराची साथ पसरण्याची भीती लक्षात घेऊन वार्ड १२९ मध्ये नगरसेवक सूर्यकांत गवळी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी आरोग्य शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांना नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याची माहिती गवळी यांनी दिली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages