मृतांना व सरकारला श्रद्धांजली वाहण्यासाठी 3 ऑकटोबरला "काळा दिवस" पाळण्याचे आवाहन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 October 2017

मृतांना व सरकारला श्रद्धांजली वाहण्यासाठी 3 ऑकटोबरला "काळा दिवस" पाळण्याचे आवाहन

मुंबई । प्रतिनिधी -
पश्चिम रेल्वेवरील एल्फिस्टन रोड स्थानकात 29 सप्टेंबरला झालेला दुर्घटना सरकार आणि रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने झाली आहे. या दोन्ही यंत्रणांचे लक्ष वेधण्यासाठी तसेच मृतांना आणि झोपलेल्या सरकारला श्रद्धांजली वाहण्यासाठी 3 ऑक्टोबरला काळा दिवस पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. असा एक संदेश सोशल मिडीयावरून व्हायरल झाला असून मुंबईकरांचा याला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.

29 सप्टेंबरला सकाळी एल्फिस्टन रोड स्थानकात दुर्घटना घडून 23 प्रवाश्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेच्या ठिकाणी पादचारी पुलावर प्रवासी आणि नागरिकांकडून मेणबत्या लावून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. हि दुर्घटना घडली त्यावेळी नवरात्रीचे दिवस सुरु होते. दुसऱ्याच दिवशी दसरा व विजयादशमी हा सण होता. अश्यावेळी घरातील एक व्यक्ती, काहींच्या घरातील कमावता व्यक्ती मृत झाला आहे. यामुळे या मृतांच्या कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे. हे सर्व झोपलेल्या सरकारमुळे झाले असल्याने या दिवशी काळा दिवस पाळण्याचे आव्हान करण्यात आले आहे.

सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या या संदेशात मुंबईकरांना साद घालण्यात आली आहे. दसऱ्याचे ९ दिवस नवरंग साड्यांची कल्पना महिलावर्गाने राबवली. तसेच या मंगळवारी काळ्या रंगाचे कपडे घालण्याचे आवाहन सर्व जातीधर्माच्या मुंबईकरांना करण्यात आले आहे. झोपलेल्या सरकारचा निषेध म्हणून रेल्वेचा प्रत्येक प्रवासी मंगळवारी काळ्या रंगात रंगेल अशी अपेक्षा या संदेशात केली आहे. प्रवासी आणि मुंबईकर गांधीजींच्या अहिंसेच्या मार्गाने शांतपणे आपला राग व आक्रोश व्यक्त करावा असेही यात आवाहन करण्यात आले आहे.

सोशल मिडीयावर व्हायरल झालेला संदेश -
============================
3 ऑक्टोबर काळा दिवस पाळण्याचे आवाहन
मुंबईकरांनो,
- ही श्रद्धांजली वाहणार का?
दसऱ्याचे 9 दिवस नवरंग साड्यांची कल्पना महिलावर्गाने राबवली.
तसाच हा मंगळवार - काळा रंग
झोपलेल्या सरकारला श्रद्धांजली।
सर्व पुरुष-महिला, सर्व जातीधर्माच्या मुंबईकरांना जाहीर आवाहन।
एल्फिस्टन रोड रेल्वे दुर्घटना मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 3 ऑक्टोबर - काळा मंगळवार पाळूया।
झोपलेल्या सरकारचा निषेध म्हणून रेल्वेचा प्रत्येक प्रवासी मंगळवारी काळ्या रंगात रंगेल
आणि गांधीजींच्या अहिंसेच्या मार्गाने शांतपणे आपला राग व आक्रोश व्यक्त करेल.
दोन दिवसात संकल्प करा व हा मेसेज होऊ दे मुंबई, ठाणे, पुणे, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, विरार, डहाणू पर्यंत व्हायरल...
बंधू-भगिनींनो, हे कराल ना?

Post Bottom Ad