भांडूप पोटनिवडणुकीत "ड्राय डे"कडे दुर्लक्ष - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

भांडूप पोटनिवडणुकीत "ड्राय डे"कडे दुर्लक्ष

Share This

मुंबई । प्रतिनिधी -
मुंबई महानगरपालिकेच्या भांडूप पश्चिम येथील प्रभाग क्रमांक 116 ची पोटनिवडणूक बुधवारी संपन्न होत असताना या प्रभागातील बार आणि देशी दारूची दुकाने सर्रास उघडी ठेवण्यात आली होती. याठिकाणी अनेक मतदार मतदान करून थेट या दारूच्या दुकानात जाऊन बाहेर येत होते. यामुळे मतदान करा आणि दारू पिऊन जा अशी शक्कल लढवली असल्याची शक्यता असल्याचे वर्तविले जात आहे.

मतदानाच्या आधी आणि मतदान संपेपर्यंत नियमानुसर ड्राय डे घोषित केला जातो. भांडूप पश्चिम येथील प्रभाग क्रमांक 116 मध्ये सात ठिकाणी २९ मतदान केंद्रावर मतदान सुरु होते. मतदान सुरु असलेल्या केंद्रापैकीच प्रताप नगर विभागातील बीपीईएस ऑडीटोरियम मतदान केंद्राच्या जवळच हाकेच्या अंतरावर एकता पोलीस चौकी आहे. या पोलीस चौकी सामोरच विजय कंट्री लिकर बार तसेच बाजूला रवी राज बार अँड रेस्टोरंट आहे. हि दोन्ही दारूची दुकाने मतदानाची प्रक्रिया सुरु असताना उघडी ठेवण्यात आली होती. अनेक मतदार मतदान करून थेट या दारूच्या दुकानात जात असल्याने मतदान केल्यावर या ठिकाणी फुकट दारूची सोय तर केली नाही ना असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

प्रभागात मतदानासाठी राज्य सरकारने सुट्टी जाहीर केली. मात्र मतदानाच्या दिवशी या प्रभागात दारूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश काढायचे विसरून गेले. मतदान प्रक्रिया सुरु असताना या ठिकाणी "ड्राय डे" घोषित केला नाही का ? तुम्हाला तशी काही माहीत किंवा नोटीस दिली आहे का ? अशी विचारना केली असता रवी राज या बारमध्ये उपस्थित असलेल्या एका वयोवृद्ध व्यक्तीने आम्हाला कोणीही बार बंद ठेवण्याची नोटिस किंवा तशी कल्पना दिली नाही असे सांगितले. या प्रकाराबाबत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाच्या उपस्थित अधिकाऱ्यांना विचारल्यावर आम्ही लेखी पत्र राज्य उत्पादन शुक्ल विभागाला दिले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने निवडणुकीच्या दिवशी या प्रभागातील दारूची दुकाने आणि बार बंद ठेवायला हवे होते. जी बार आणि देशी दारूची दुकाने उघडी आहेत त्यावर पोलिसांनी कारवाई करायला हवी असे सांगण्यात आले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages