विक्रोळीत कार्यालयात घुसून विवाहितेवर चाकूने हल्ला - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

विक्रोळीत कार्यालयात घुसून विवाहितेवर चाकूने हल्ला

Share This

मुंबई 21 Oct 2017 - मुंबईतील विक्रोळीत विवाहितेवर एका तरुणाने चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर आरोपीला पार्कसाईट पोलिसांनी अटक केली आहे. तर जखमी तरुणीला घाटकोपर येथील महापालिकेच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  

साबीर शेख (२३ वर्षे) हा वाकोला परिसरात रहात असून एका टेलिफोन कंपनीत काम करतो. काही दिवसांपूर्वी फेसबुकवर त्याची २७ वर्षीय विवाहितेशी ओळख झाली होती. दोघांमध्ये मैत्रीचे संबध होते. जखमी महिला विक्रोळी स्थानकाबाहेरील खासगी कार्यालयात रिसेप्शनीस्ट आहे. अनेक दिवसांपासून ही महिला शेखला टाळत होती. यामुळे चि़डून जाऊन साबीरने आज तिच्या कार्यालयात घुसून महिलेवर कटरने हल्ला केला. त्यात महिलेच्या चेहऱ्यावर आणि हाताला गंभीर जखमा झाल्या. तिला उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा हल्ला एकतर्फी प्रेमातून झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस याबाबत अधिक तपस करत आहेत. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages