न्यायालयाच्या दणक्यानंतर पालिकेने अग्निशमन केंद्र हटवले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

न्यायालयाच्या दणक्यानंतर पालिकेने अग्निशमन केंद्र हटवले

Share This

मुंबई । प्रतिनिधी 31 Oct 2017 -
मलबार हिल येथील प्रियदर्शनी पार्कमध्ये चार महिन्यापूर्वी मोठा गाजावाजा करत उभारलेले इकोफ्रेंडली अग्निशमन केंद्र न्यायालयाच्या दणक्यानंतर महापालिकेने मंगळवारी हटवले. सोमवारी हे केंद्र हटविण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. या आदेशाची पालिकेने अंमलबजावणी न केल्यास न्यायालयाने कारवाई करण्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर हे अग्निशमन केंद्र हटवले.

मलबार हिल येथील परिसरात आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रियदर्शनी पार्कमध्ये महापालिकेने अग्निशमन केंद्र उभारले होते. यावेळी इको फ्रेंडली संकल्पनेवर आधारीत केंद्र बांधले. मात्र पार्कमधील जॉगिंग ट्रॅक आणि वॉकिंग ट्रॅकमुळे नागरिकांना अडथळा निर्माण होऊ लागल्याचा आरोप करत मलबार हिल सिटीझन फोरमने उच्च न्यायालयात याविरोधात जनहित याचिका दाखल केली. न्यायालयाने या याचिकेवर समिती गठीत केली. या समितीने सादर केलेल्या अहवालात पार्कमधील जॉगिंग व वॉकिंग ट्रॅकमुळे अडथळा निर्माण होत आहे. अपघात होण्याची देखील शक्यता असल्याने येथील अग्निशमन केंद्र तात्काळ हटवा, असे निर्देश दिले. पालिकेने या निर्देशाचे पालन करत अग्निशमन केंद्र हटविले आहे. मात्र, याप्रकरणी १ नोव्हेंबरला पुन्हा सुनावणी होणार आहे, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages