छेडछाडीच्या भीतीने मुलीची धावत्या ट्रेनमधून उडी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

छेडछाडीच्या भीतीने मुलीची धावत्या ट्रेनमधून उडी

Share This

मुंबई | प्रतिनिधी 23 Oct 2017 -
मुंबईच्या लाईफलाईन असलेल्या लोकलमध्ये याआधीही महिलांशी अश्लील चाळे केल्याचे प्रकार घडले आहेत. हे प्रकार ताजे असतानाच महिला डब्ब्यात एक तरुण चढला, हा तरुण लेडीज डब्यात चढल्याने छेडछाड होईल या भीतीने पायल कांबळे या तरुणीने चालत्या लोकलमधून उडी मारण्याची घटना घडली आहे. यामध्ये तिच्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिच्यावर उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार पायल कांबळे ही तरुणी रविवारी सकाळी सकाळी 9.29 च्या लोकलने सीएसएमटी स्थानकावरुन करी रोडला क्लासला जात होती. क्लासला जाण्यासाठी उशीर झाला असल्याने ती सेकंड क्लास लेडिज डब्ब्यामध्ये चढली. त्यावेळी डब्यात कोणतीही महिला प्रवासी नव्हती. ट्रेन सुरु झाल्यानंतर अचानक एक तरुण डब्यात घुसला. म्हणून पायल घाबरली आणि अलार्म चेन ओढली, पण ट्रेन थांबली नाही. त्या तरुणाने मला शांत राहायला सांगितलं. यानंतर मी अजून घाबरले, आणि पुन्हा चेन ओढण्यास सुरुवात केली. तो पुन्हा पुन्हा वॉर्निंग देऊ लागला आणि जवळ येण्याचा प्रयत्न करु लागला'. घाबरलेली पायल ट्रेनच्या दरवाजावर आली. ट्रेनचा वेग कमी असल्याने तिने चालत्या ट्रेनमधून उडी मारली. त्यावेळी काही गँगमॅन तिथे उपस्थित होते. त्यांनी तिला पडताना पाहिलं आणि धाव घेतली. तिला जखमी अवस्थेत प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वर आणण्यात आलं. तिच्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. 'माझ्या आईला फोन करुन माहिती देण्यात आली आणि मला सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलं. माझ्या पायाला प्रचंड दुखापत झाली होती, त्यातून रक्त वाहत होतं. पायाकडे पाहण्याची माझी हिंमतही होत नव्हती', असं पायलने सांगितलं आहे. पायलवर उपचार करण्यात आले असून, सध्या तिची प्रकृती धोक्याबाहेर आहे. दरम्यान जीआरपी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पायलने दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपीचं रेखाचित्र रेखाटण्यात आलं आहे. 'आम्ही सीएसएमटी आणि मस्जिदचं सीसीटीव्ही तपासत असून, आरोपीची ओळख पटवण्यासाठी पायलला दाखवत आहोत. कदाचित फोन किंवा दागिन्यांच्या चोरीसाठी हा प्रयत्न झाला असावा. आम्ही पायलचा जबाब नोंदवला आहे', अशी माहिती अधिका-याने दिली आहे. चोरीच्या उद्देशाने चोरटा महिला डब्यात शिरला असेल, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages