विचारे कुरियरमधील कामगारांचा बोनस आणि पगारवाढीसाठी सोमवारी मोर्चा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

विचारे कुरियरमधील कामगारांचा बोनस आणि पगारवाढीसाठी सोमवारी मोर्चा

Share This
मुंबई । प्रतिनिधी - विचारे कुरियर या मुंबईमधील नामांकित आस्थापनेतील कर्मचारी बोनस व आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारी (9 ऑक्टोबरला) कांदिवली आॅफीसवर निषेध मोर्चा काढणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व मनसे कामगार सेना प्रदेश सरचिटणीस गजानन राणे व राज पार्टे हे करणार असल्याची माहिती मनसेप्रणित विचारे कुरियर अॅण्ड लाॅजिस्टीक प्रा.लि. युनिटचे रवी जाधव (कोतापकर) यांनी दिली आहे.

विचारे कुरियरमधील 1800 कामगार काम करत आहेत. या कामगारांना करारानुसार 1000 रुपये पगार वाढ व 12 टक्के बोनस द्यायला मॅनेजमेंटने नकार दिला आहे. कामगार आयुक्तांनी आदेश देऊनही मॅनेजमेंट मात्र हे आदेश पाळण्यास तयार नाही. मॅनेजमेंट कामगार आयुक्तांचे आदेश पाळत नसल्याने याबाबत मनसे कामगार सेनेचे राज पार्टे यांनी कामगार आयुक्तांची भेट घेऊन याबाबत कारवाई करण्याची मागणी केली आहे. कामगार आयुक्तांचे आदेश मॅनेजमेंट मानत नसल्याने कामगारांना त्यांचा न्याय मिळवून देण्यासाठी सोमवारी सकाळी 10 वाजता कांदिवली आॅफीसवर निषेध मोर्चा काढाला जाणार आहे. विचारे कुरियरचे मालक महेंद्र विचारे यांनी सामोरे जाऊन आपली भूमिका स्पष्ट करावी व कामगारांच्या बोनस तसेच पागारवाढीचा निर्णय त्वरित जाहीर करावा अश्या मागण्या केल्या जाणार असल्याचे रवी जाधव (कोतापकर) यांनी कळविले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages