महापालिका दिव्यांगांना तीनचाकी स्कुटर देणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महापालिका दिव्यांगांना तीनचाकी स्कुटर देणार

Share This

अर्थसंकल्पात ६ कोटी रुपयांची तरतूद -
मुंबई । प्रतिनिधी 20 Nov 2017 -
महापालिकेतर्फे जेंडर अर्थसंकल्पाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना बेस्टबसमधून मोफत प्रवासाची सुविधा देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. आता दिव्यांग व्यक्तींना घरातून इच्छित स्थळी सुरक्षित व सुलभ रित्या प्रवास करता यावा, यासाठी लवकरच तीन चाकी स्कुटर देण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे. त्यामुळे तीनचाकी स्कुटरचा मुंबईतील सुमारे १०७१ दिव्यांग व्यक्तींना त्याचा लाभ घेता येणार आहे. महापालिकेने त्यासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात ६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

एका दिव्यांग व्यक्तीला किमान ५६ हजार रुपये किंवा स्कुतरची खरेदी किंमतीच्या ७५ टक्के रक्कम पालिकेकडून दिले जाणार आहे. मात्र या स्कुटरचा लाभ घेण्यासाठी संबंधित दिव्यांग व्यक्तीला प्रथम स्वतः च्या खर्चाने आपल्या आवडीची तीन चाकी स्कुटर खरेदी करावी लागेल. या स्कुटर खरेदीची पावती पालिकेच्या संबंधित खात्याच्या अधिका-याकडे जमा करावी लागेल. स्कुटर खरेदीबाबतची खात्री झाल्यानंतर संबंधित दिव्यांग व्यक्तीच्या बँक खात्यात त्या स्कुटरची रक्कम जमा करण्यात येणार आहे. कोणत्या दिव्यांग व्यक्तीला कशा प्रकारे ही स्कुटर द्यायची याबाबतची कार्यपद्धती, नियम वगैरे पालिका प्रशासन ठरविणार आहे. होंडा ऍक्टिव्हा स्कुटरची किंमत ५२,८७० रुपये असून या स्कुटरला साईड व्हील्स लावण्याचा खर्च २२,०५० एवढा आहे. म्हणजे या स्कुटरची एकूण किंमत जरी ७४,९२० रुपये होणार असली तरी पालिका सदर दिव्यांग व्यक्तीला ७५ टक्के रक्कम म्हणजे ५६,००० रुपये देणार आहे.

असे असतील निकष --
-- दिव्यांग व्यक्ती मुंबईची रहिवाशी असावी.
-- ४०% किंवा त्यापेक्षा अधिक अपंगत्वाचे प्रमाणपत्र धारक असणे आणि १८-६० वय असणे आवश्यक आहे.
-- दिव्यांग व्यक्तीकडे स्कुटर चालविण्याचा परवाना असावा.
-- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये अथवा त्यापेक्षा कमी असावे.
-- शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक उपक्रम, खाजगी आस्थापनेवर कायम नोकरीत नसलेल्या व्यक्ती, असावेत.
-- आधार कार्ड आवश्यक.
-- वाहनाचा वापर स्वतःच करणार असे प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल.
-- तहसीलदार यांच्याकडील उत्पन्नाचे प्रमाणपत्र देणे आवश्यक.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages