बेस्टच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बस दाखल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बेस्टच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बस दाखल

Share This
मुंबई | प्रतिनिधी 10 Nov 2017 -
प्रदूषणमुक्त इलेक्ट्रिक बस शुक्रवारी ‘बेस्ट’च्या ताफ्यात दाखल झाली. वडाळा बेस्ट आगार येथे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण झाले. प्रदूषणमुक्त आणि आरामदायी प्रवास असलेली बस महाराष्ट्रातील पहिलीच हायटेक बस ठरली आहे. 

मुंबईसह देशभरातील मोठ्या शहरांमध्ये वाढत्या वाहनांमुऴे होणार्‍या प्रदुषणाचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत ‘बेस्ट’मध्ये प्रदूषणविरहित बस आणण्याची संकल्पना युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मांडली होती. २०१५ च्या महापालिकेच्या अर्थसंकल्पात याबाबत १० कोटींची तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार बॅटरीवर चालणार्‍या बस खरेदी करण्यात आल्या आहेत. प्राथमिक स्वरुपात फोर्ट परिसरात या बस फेर्‍या चालवण्यात येणार आहेत. तर टप्प्याटप्प्याने या बसची संख्या वाढवली जाणार आहे. या बसच्या लोकार्पण सोहळ्यास उपमहापौर हेमांगी वरळीकर, सभागृह नेते यशवंत जाधव, स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर, ‘बेस्ट’ समिती अध्यक्ष अनिल कोकीळ, सुधार समिती अध्यक्ष अनंत (बाळा) नर, बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे, आरोग्य समिती अध्यक्षा रोहिणी कांबळे, माजी महापौर स्नेहल आंबेकर, श्रद्धा जाधव, तृष्णा विश्वासराव आदी उपस्थित होते.

इलेक्ट्रिक बसबाबत --
संपूर्णपणे बॅटरीवर चालणार्‍या सहा गाड्या असणार आहेत. एका गाडीची किंमत १.६ कोटी असून शनिवारपासून नरिमन ते चर्चगेट परिसरात चार बस धावतील. चालक आणि ३१ प्रवासी बसण्याची व्यवस्था असेल. प्रत्येक चार्जिंगनंतर २०० किमी चालण्याची क्षमता डिझेल खर्च डिझेल, इलेक्ट्रिक बसपेक्षा कमी आरामदायक आसने, पॅसेंजर अ‍ॅरेजमेंट सिस्टीम इलेक्ट्रिक असल्यामुळे गेअर, क्लचसारखी असेल.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages