सुशोभित जुहू चौपाटीला महापौरांची भेट - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सुशोभित जुहू चौपाटीला महापौरांची भेट

Share This

मुंबई । प्रतिनिधी 15 Nov 2017 -
जुहू चौपाटीवर बृहन्‍मुंबई महापालिकेच्‍या वतीने सुशोभित विद्युत रोषणाई केल्‍यानंतर जुहू चौपाटीवर फेरफटका मारण्‍यासाठी दररोज येणाऱया मुंबईकर नागरिकांच्‍या याबाबतच्‍या काही सूचना तसेच तक्रारी जाणून घेण्‍यासाठी तसेच चौपाटीवरील साफसफाई कामाचे निरिक्षण करण्‍यासाठी मुंबईचे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी जुहू चौपाटीला भेट देऊन ज्‍येष्‍ठ नागरिकांशी संवाद साधला.

महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी चौपाटीचे निरिक्षण केल्‍यानंतर, बृहन्‍मुंबई महापालिकेने केलेल्‍या कामाच्‍या ठिकाणी बृहन्‍मुंबई महापालिकेचे नामफलक लावण्‍याची संबधित अधिकाऱयांना सूचना केली. याठिकाणी येणाऱया नागरिकांशी दिर्घ चर्चा करुन, त्‍यांची मते जाणून घेतली. तसेच महापालिकेच्‍या वतीने यापुढील काळात आणखी सोयीसुविधा देणार असल्‍याचे महापौरांनी यावेळी सांगितले. त्‍याचप्रमाणे शनिवार व रविवारला वाढती पर्यटकांची संख्‍या लक्षात घेता, याठिकाणी निर्माण होणाऱया कचऱयाची तातडीने विल्‍हेवाट लावण्‍यासोबतच कचरा संकलनासाठी अतिरिक्त कचराकुंडी ठेवण्‍याची सूचना महापौरांनी घनकचरा विभागाच्‍या अधिकाऱयांना केली. तसेच पायामध्‍ये काहीही पादत्राणे न घालता चालणाऱया नागरिकांसाठी सुरक्षिततेच्‍या दृष्‍टीने काचसारख्‍या वस्‍तु चौपाटीवरुन नियमीतपणे संकलीत करण्‍याची सूचना महापौरांनी संबधित अधिकाऱयांना यावेळी केली. याप्रसंगी माजी नगरसेवक सुभाष कांता सावंत व मनोहर पांचाळ हे मान्‍यवर उपस्थित होते.

अंधेरीतील रस्ते व जलवाहिन्यांचे काम प्रगतीपथावर - 
पश्चिम उपनगरातील अंधेरीवासीयांना लवकरच चांगले रस्ते मिळणार असून पाणी तुंबण्यातूनही सुटका होणार आहे. विभागातील पर्जन्यजलवाहिन्यांची दुरुस्ती सध्या प्रगतीपथावर असून रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण लवकरच करण्यात येणार आहे. पालिकेच्या माध्यमातून करण्यात येणार्‍या या कामांसाठी 137 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. अंधेरी स्थानक ते मेट्रो मार्गाच्या पश्चिम द्रुतगती महामार्ग स्थानकादरम्यान पर्जन्य जलवाहिन्यांच्या कामानंतर या मार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. यामुळे विभागातील नागरिकांची पाणी साचण्याच्या संकटातून मुक्तता होणार आहे. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी प्रगतीपथावरील या कामाची पाहणी करून कामाचा आढावा घेतला. यावेळी पालिका अधिकार्‍यांशी संवाद साधला. हे काम दिलेल्या मुदतीत पूर्ण करा अशा सूचना त्यांनी अधिकार्‍यांना यावेळी दिल्या. यावेळी माजी नगरसेवक सुभाष सावंत, मनोहर पांचाळ आदी उपस्थित होते.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages