एमएमआरडीएच्या हस्तांतरित क्षेत्राचा विकास आराखड्यात समावेश होणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

एमएमआरडीएच्या हस्तांतरित क्षेत्राचा विकास आराखड्यात समावेश होणार

Share This

डिसेंबर पर्यंत सूचना व हरकती मागवल्या -
मुंबई | प्रतिनिधी 23 Nov 2017 -
मुंबई महानगरपालिकेने शहराचा 2014 ते 2034 या वीस वर्षांचा प्रारूप आराखडा बनवला आहे. हा आराखडा राज्य सरकारकडे मंजुरीसाठी गेला असताना एमएमआरडीएने आपल्याकडील तीन क्षेत्र मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित केली आहेत. या तीन क्षेत्रांचा आराखडा मुंबई महापालिकेने बनवून मुंबईच्या सन 2014 - 34 च्या विकास आराखड्यात त्याचा समावेश करावा अशी सूचना एमएमआरडीएने केली आहे.

महापालिकेने मुंबईचा विकास आराखडा तयार करून तो राज्य शासनाकडे मंजुरीच्या पाठवला आहे. या आराखड्यात एमएमआरडीएने हस्तांतरित केलेल्या क्षेत्रामध्ये बांद्रा - कुर्ला संकुलाच्या अधिसूचित क्षेत्रातील मिठी नदी व लालबहादूर शास्त्री मार्ग, बांद्रा - कुर्ला संकुलाच्या अधिसूचित क्षेत्रातील अ ब्लॉक आणि ओशिवरा जिल्हा केंद्राच्या क्षेत्रातील स्वामी विवेकानंद रस्त्याच्या पश्चिमेकडील क्षेत्राचा यात समावेश केला आहे. याबाबत राजपत्रात 18 ऑक्टोबर 2017 रोजी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागरिकांनी या क्षेत्राच्या आराखडयाबाबत 30 डिसेंबर 2017 पर्यंत सूचना व हरकती मागवण्यात आल्या आहेत. यानंतर नियोजन समिती मार्फत सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर महापालिकेच्या मंजुरी नंतर या क्षेत्राचा आराखडा राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला जाईल अशी माहिती भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी दिली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages