मनसे-काँग्रेस कार्यकर्ते भिडले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मनसे-काँग्रेस कार्यकर्ते भिडले

Share This

मुंबई : एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर फेरीवाल्यांच्या विरोधात मनसेने जोरदार फेरीवाला हटाव मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत मनसैनिकांनी अनेक फेरीवाल्यांना हुसकावून देत मारहाण केली. मात्र अधिकृत फेरीवाल्यांवर अन्याय नको असे सांगत गरीब फेरीवाल्यांना मारहाण कशासाठी असा सवाल मुंबई काँग्रेसने केला होता. बुधवारी मुंबई काँग्रेसने दादरमध्ये फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ मोर्चाचे नियोजन केले होते. मात्र मोर्चा काढण्याआधीच मनसेच्या कार्यकर्त्यांनी उधळला. यावेळी मनसे- काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांसमोर भिडले. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.

मागील काही दिवसांपासून फेरीवाल्यांविरोधात मनसेने कारवाई सुरू केली आहे. रेल्वे परिसर व फुटपाथवर बसणा-या अनधिकृत फेरीवाल्यांना मनसैनिकांमकडून हुसकावून लावले जाते आहे. फेरीवाला- मनसेच्या संघर्षात काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी उडी घेतल्याने फेरीवाल्यांचा मुद्दा चिघळला आहे. मालाड मध्ये फेरीवाल्यांसमोर चिथावणी भाषण केल्याचा आरोप निरुपम यांच्यावर करण्यात आला. यानंतर मालाडमधील मनसेच्या विभाग प्रमुखांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यानंतर हा वाद अधिक चिघळला आहे. बुधवारी काँग्रेसतर्फे दादरमध्ये फेरीवाला समर्थनार्थ मोर्चा आयोजित करण्यात आला होता. मनसेचा बालेकिल्ला असलेल्या दादरमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकत असल्याचे कारण देत पोलिसांनी फेरीवाला सन्मान मोर्चा काढण्यास परवानगी नाकारली होती. तरीही काँग्रेसने हा मोर्चा काढला होता. मात्र मनसेने मोर्चा यशस्वी होऊ दिला नाही. 

मनसेचे जशास तसे उत्तर -
रेल्वे स्थानकापासून १५० मीटरच्या परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांना बसू देऊ नये या मागणीसाठी मनसेचे आंदोलन केले आहे. काँग्रेस मोर्चाकाढून या अनधिकृत फेरीवाल्याचे समर्थन करण्याच्या प्रयत्नात होती. परंतु मनसे कार्यकर्त्यांनी जशास तसे उत्तर देत हा मोर्चा उधळून लावला. तसेच मनसेला घाबरून मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम घरात लपून बसले.
संदीप देशपांडे , सरचिटणीस , मनसे

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages