"राईट टू पी"साठी वर्षा बंगल्यावर टमरेल आंदोलन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

"राईट टू पी"साठी वर्षा बंगल्यावर टमरेल आंदोलन

Share This

महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात -
मुंबई । प्रतिनिधी -
एकीकडे मुंबई हागणदारी मुक्त केल्याचा दावा मुंबई महानगरपालिका करत असताना मुंबईत महिलांसाठी पुरेसे शौचालये नाहीत. जी काही शोउचलये आहेत ती शौचालये अस्वच्छ असल्याच्या निषेधार्थ रविवारी 'राईट टू पी' चळवळीच्या महिला कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टमरेल भेट देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी या महिला कार्यकर्त्यांना 'वर्षा' बंगल्याबाहेर ताब्यात घेतले आहे.

मुंबईत महिलांसाठी पुरेशी शौचालये आणि मुताऱ्या असाव्यात म्हणून 'राईट टू पी' चळवळ उभी करण्यात आली आहे. या चळवळीच्या महिला कार्यकर्त्यांनी मुंबई महापालिकेकडे सातत्याने तक्रारी करून त्याचा पाठपुरावा केला आहे. या चळवळीच्या मागण्यांसाठी तत्कालीन महापौर सुनील प्रभू आणि तत्कालीन पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्यासह आताचे पालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली आहे. आपल्या मागण्या महिला कार्यकर्त्यांनी आयुक्तांकडे मांडल्या आहेत. याबाबतच्या मागण्या आयुक्तांकडे मांडूनही महिलांचा प्रश्न न सुटलेला नाही. अशी परिस्थिती असताना पालिकेने मुंबईला हागणदरीमुक्त घोषित केल्याने या कार्यकर्त्यांच्या जखमांवर मीठ चोळले आहे. त्यामुळे राईट टू पीच्या महिला कार्यकर्त्या मुख्यमंत्र्यांकडे आपल्या समस्यांचे व मागण्यांचे निवेदन देण्यासाठी आल्या होत्या. या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेट देण्यासाठी टमरेल आणि अस्वच्छ शौचालयांचे फोटोही आणले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी या महिला कार्यकर्त्यांना भेट नाकारली. त्यामुळे संतापलेल्या महिला कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला असता, या महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवल्याने मुख्यमंत्र्यांना टमरेल भेट देण्याचा प्रयत्न मात्र फसला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages